Neelam Gorhe

Dr. Neelam Gorhe : आळंदीचा विकास आराखडा तयार करताना भाविकांना केंद्रस्थानी ठेवावे : डॉ. नीलम गोऱ्हे

597 0

आळंदी : भाविकांना केंद्रस्थानी ठेवून नियोजनबद्ध विकास आराखडा बनवावा तसेच देवस्थानच्या विकासाकरिता लागणाऱ्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांसह होमागार्ड्सची नेमणूक बारा महीने असली पाहिजे. शेगाव येथील श्री. गजानन महाराज संस्थांनचा पॅटर्न माऊलींच्या मंदिरात राबवला जावा असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री. क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी स्थळाचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेतले. यादरम्यान त्यांनी मंदिर परिसरातील अजाण वृक्ष, माऊलींचे कुलदैवत श्री. सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन त्यांनी घेतले. डॉ. गोऱ्हे यांनी ग्रंथ भांडाराला भेट देऊन माऊलींचे पुस्तक खरेदी केले. माऊलींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या परिसरात आल्यावर मानला समाधान वाटल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.यावेळी आळंदी देवस्थानचे वतीने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. देवस्थान समितीकडून डॉ. गोऱ्हे यांनी मंदिराच्या विकासकामांची माहिती घेतली.

याप्रसंगी, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, सौ. सतलज दिघे – गोऱ्हे, शिवसेना महिला पदाधिकारी श्रीमती. मंगलाताई हुंडारे, श्रीमती. संगीता फफाळ, मंदिर समिती व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर वीर, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. संकेत वाघमारे, माऊलीदास महाराज, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री. प्रकाश वाडेकर, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ सदस्य श्री. नितीन गोरे, श्री. युवराज शिंगाडे, श्री. राहुल चव्हाण, उपसभापती यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. किरण काकडे, श्री. अविनाश राळे, श्री. सचिन शिंदे, श्री.अर्जुन मेदनकर, श्री. साईनाथ ताम्हाणे उपस्थित होते.

Share This News

Related Post

मावळमध्ये थरार : चोरीच्या उद्देशाने उचकटले कपाट; आवाजाने जाग आली आणि मालकिणीचे रौद्ररूप पाहून चोरट्यांनी ठोकली धूम, पहा व्हिडिओ

Posted by - October 27, 2022 0
(मावळ) पुणे : मावळमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेने नागरिक या महिलेच्या धाडसाचं कौतुक करत आहे. चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश…

Kashmir Ganpati : काश्मीरमधील दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

Posted by - September 21, 2023 0
पुणे : काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची (Kashmir Ganpati) दीड दिवसाच्या विसर्जनाने सांगता झाली. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह प्रमुख मानाच्या…
Jail

Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून होणार सुटका; केंद्रीय गृह सचिवाकडून माहिती

Posted by - August 12, 2023 0
मुंबई : मंगळवारी (15 ऑगस्ट) देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन…

पुण्यायातील विश्रांतवाडी येथील आरटीओ ऑफीसला आग

Posted by - January 15, 2023 0
विश्रांतवाडी फुलेनगर येथील आरटीओ कार्यालयाच्या आवारामधे जप जप्त केलेली दहा वाहने मकर संक्रातीच्याच दिवशी जळून खाक झाली आहेत. कार्यालयाला रविवारमुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *