Dr-Mangala-Narlikar

Dr Mangala Narlikar : ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला जयंत नारळीकर यांचे निधन

458 0

पुणे : ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (Dr Mangala Narlikar) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पुण्यातील राहत्या घरी डॉ. मंगला नारळीकर यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. त्या अंतराळशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. डॉ. मंगला नारळीकर यांना कॅन्सर झाला होता. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईं यांनी खंबीरपणे साथ दिली होती.

डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठीचे गणिताच्या सोप्या वाटा, नभात हसरे तारे, पहिलेले देश, भेटलेली माणसं हे प्रवासवर्णन यासारखी त्यांची पुस्तकं विशेष गाजली. मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठतून 1962 साली बीए ही पदवी घेतली होती. त्यानंतर 1964 साली त्या एम.ए. (गणित) झाल्या. या परीक्षेत त्यावेळी त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. त्यांना तत्कालीन कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले होते.

यानंतर त्यांनी1964 ते 1966 या काळात इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून काम केले. 1967 ते 1969 मध्ये केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत त्यांनी गणिताचे अध्यापन केले. 1965 मध्ये मंगला राजवाडे यांचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी झाला.

Share This News

Related Post

रश्मी शुक्ला यांच्याविरोधात 500 कोटींचा दावा ठोकणार – नाना पटोले (व्हिडिओ)

Posted by - March 24, 2022 0
मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग प्रकरणात…

दोन दिवसांत नवा व्हिडिओ बॉम्ब – चंद्रकांत पाटील 

Posted by - March 13, 2022 0
देवेंद्र फडणवीस यांच्या घरी मुंबई सायबर पोलिसांची टीम ही आयपीएस पोलीस बदली अहवाल लीक प्रकरणात चौकशीसाठी हजर झाली आहे. केंद्रीय…

जलसमाधी आंदोलन होणार? रविकांत तुपकरांना मुंबई पोलिसांची नोटीस; शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमाने संघटना आक्रमक

Posted by - November 23, 2022 0
मुंबई : शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमाने संघटना आक्रमक झाली असून, जलसमाधी आंदोलनासाठी रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना सोबत घेऊन रवाना झाले आहेत.…
Sarthak Kamble

Pimpri-Chinchwad : महानगरपालिकेच्या शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू; पिंपरी- चिंचवडमधील घटना

Posted by - February 16, 2024 0
पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचवडमधील चाफेकर विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *