सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापर मर्यादा 15 दिवस शिथीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

509 0

पुणे : जिल्ह्यात २०२३ मधील सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी १५ दिवसासाठी मर्यादा शिथील करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश जारी केले आहेत.

केंद्र शासनाने ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतचे नियम निश्चित केलेले आहेत. श्रोतेगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे, मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे.

त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी सवलतीचे १५ दिवस निश्चित करण्यात आले आहेत. १९ फेब्रुवारी शिवजयंती, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, २३, २४, २६ व २७ सप्टेंबर गणपती उत्सव, २८ सप्टेंबर ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशी, २३ व २४ ऑक्टोबर नवरात्री उत्सव, १२ नोव्हेंबर दिपावली, २५ डिसेंबर ख्रिसमस (नाताळ सण), ३१ डिसेंबर वर्षअखेर तसेच महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार उर्वरित २ दिवस परवानगी देण्यात येईल. ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा, क्षेत्राप्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेऊ नये तसेच शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याचे, आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

सावधान ! राज्यासह पुण्यात गोवरचा धोका वाढतोय; डॉक्टरांनी काय दिला सल्ला ? पाहा

Posted by - November 30, 2022 0
पुणे : मुंबई पाठोपाठ आता पुण्यासह राज्यात गोवरचा उद्रेक झाला आहे. गोवर हा कोरोनापेक्षा पाच पट वेगाने पसरत आहे. गोवर…

कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3.4 टक्के कमी रुग्ण

Posted by - February 2, 2022 0
नवी दिल्ली- देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत कोरोना विषाणूचे एक लाख 61…

एकनाथ शिंदे गटाला भाजपाची मोठी ऑफर ? शिंदे गटाला 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.…

Breaking !कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा हृदयविकारानं मृत्यू

Posted by - April 2, 2022 0
कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईलचा…

“हे गणराया राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे…!”- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे श्रीमंत दगडूशेठ गणपतीला साकडे VIDEO

Posted by - September 1, 2022 0
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दगडूशेठ गणपतीच दर्शन घेतलं यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री विश्वजित कदम, माजी गृहराज्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *