पुणे : माजी सैनिक महिला बचत गटाला कल्याणकारी निधीतून अनुदान वाटप

282 0

पुणे : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक महिला बचत गट उपक्रमाअंतर्गत पीएमपीएल प्रवासी वाहतूक बसेससाठी कल्याणकारी निधीतून शासनातर्फे मंजूर असलेल्या १० लाख रूपये अनुदानापैकी ३ लाख रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते गोपेश्वर महिला बचत गट हडपसर व जय जवान महिला बचत गट हडपसर यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजय पवार, कल्याण संघटक दिपक शेळके, अविनाश ढोले, पांडुरंग नवले, रामचंद्र गायकवाड, पंडित जगदाळे तसेच दोन्ही महिला बचत गटाचे पदाधिकारी व उपस्थित होते.

माजी सैनिकांच्या पत्नी तसेच विधवा महिला यांनी मिळून बचतगट तयार केले असून त्याची नोंदणी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे केली आहे. महिलांना व्यवसाय तसेच रोजगाराला चालना देण्यासाठी अनुदान देण्याची योजना आहे. या अनुदान योजनेअंतर्गत हडपसर येथील या दोन्ही महिला बचत गटांनी बस खरेदी केली आहे. ही बस पीएमपीलला भाडेतत्वावर देण्यात आली आहे.

यासाठी या महिलांनी काही प्रमाणात बचतगटाचे तर काही बँकेकडून भांडवल घेतले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने या बचतगटांना १० लाख रूपये अनुदान मंजूर केले असून चार हप्त्यात हे अनुदान देण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या हप्त्याचे आज वितरण करण्यात आले.

Share This News

Related Post

Sassoon Hospital

Sassoon Hospital : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये पुन्हा बिघाड; डॉक्टर आणि नर्ससह 3 जण अडकले

Posted by - November 18, 2023 0
पुणे : ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीची लिफ्ट पुन्हा एकदा बिघडली आहे. यामध्ये डॉक्टर आणि नर्ससह 3 जण अडकल्याची माहिती समोर…

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पुणे पोलिसांच्या कारवाईत एका मॉडेलसह सहा जणींची सुटका

Posted by - June 16, 2022 0
पुणे- स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका मॉडेलसह ६ महिलांची…
Pimpari Chinchwad

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरलं ! ठाकरे गटाच्या ‘या’ विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Posted by - March 6, 2024 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *