dheeraj-ghate

पुणे शहर भाजपात भाकरी फिरली! धीरज घाटे नवे शहराध्यक्ष

517 0

पुणे: आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने भाजपने पुणे शहर अध्यक्षपदावरून जगदीश मुळीक यांना दूर करून धीरज रामचंद्र घाटे यांची नियुक्ती केली आहे . त्यांची हि नियुक्ती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी जाहीर केली आहे.

कसबा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतरच पुणे शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. धीरज घाटे यांच्यासह दीपक पोटे, माधुरी मिसाळ, राजेश येनपुरे यांची नावं शहराध्यक्ष पदाच्या चर्चेत होती अखेर घाटे यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ पडली आहे.


धीरज घाटे हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत साने गुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक अभिनव तसेच सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यांनी पक्ष संघटनेत सुद्धा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत सध्या ते पुणे शहर प्रभारी व प्रदेश चिटणीस म्हणून काम पाहत होते.

या निवडीनंतर घाटे म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पुणे शहरात भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. राज्यात भाजपा सेना राष्ट्रवादीचे असलेले मजबूत सरकार केंद्रात हिंदुस्थानचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता बनत असताना ही जबाबदारी मिळालेली आहे. पुणे शहरात भारतीय जनता पार्टी येत्या सर्व निवडणुका अत्यंत जोमाने जिंकून आणून पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करणार आहे. या पदाचा वापर हा सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितलं पक्षसंघटना मजबूत बांधून ती एकसंध टिकवून ठेवणार असल्याचे ते म्हणाले यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.

 

Share This News

Related Post

धक्कादायक! पुण्यात दुहेरी हत्याकांड; पतीनंच केला पत्नी आणि मुलीचा खून

Posted by - March 16, 2024 0
पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पतीनेच आपल्या पत्नी आणि मुलीचा खून केलाय… अजय टेळे असं या आरोपीचं नाव…

रेम्बो सर्कस मधील कलाकारांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वाटप

Posted by - February 5, 2022 0
पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी देशाला अंत्योदयचा विचार दिला. त्या विचाराला अनुसरूनच माननीय नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबवितात.…

Chandrakant Patil : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता स्थानांना सुरुंग लावू…

Posted by - July 30, 2022 0
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता स्थानांना सुरुंग लावणार असल्याचा निर्धार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…

Special Report : पहिला श्रावणी सोमवार ! ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी…(VIDEO)

Posted by - August 1, 2022 0
आज श्रावणमासाचा पहिला सोमवार … श्रावणी सोमवार आणि या दिवशी करण्यात येणारे व्रत हे अत्यंत फलदायी असते . शिवपार्वतीची आज…

दिलासादायक! खडकवासला धरणातील पाणीसाठा वाढला

Posted by - July 11, 2022 0
पुणे: शहरात व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत पडल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गेल्या 24 तासात 0.80 टीएमसी पाणीसाठा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *