Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी आहे, पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा….दर्शना पवार शेवटच्या भाषणात म्हणाली…

892 0

पुणे : दर्शना पवार प्रकरण (Darshana Pawar Murder Case) सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. काही दिवसांपूर्वी MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि वन विभागात रुजू झालेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह (Darshana Pawar Murder Case) आढळल्याने पुणे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह सापडला होता. दर्शना राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती. पुण्यातील स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. तिने या सत्कार समारंभांत केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये आला नवा ट्विस्ट; ‘त्या’ कॉलने वाढवला सस्पेन्स

दर्शना पवार काय म्हणाली शेवटच्या भाषणात?
“प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी आहे. ती स्टोरी ऐकण्यासाठी लोकं तेव्हाच इतके उत्सुक असतात जेव्हा ती स्टोरी आपल्याकडे सक्सेस स्टोरी बनून येतेय. आपण स्कूल, कॉलेजमध्ये चांगला परफॉर्मन्स करतो. पण आज एवढा सत्कार होतोय, इतके लोकं आपल्याशी बोलताय, ते आपल्या मुलींना घेऊन येतात. विचारतात की सांग कसा अभ्यास केला पाहिजे. ती गोष्टी साध्य केलेली असते ना, त्यात खूप लोकांचा हात असतो. जेव्हा आपण अपयशी ठरतो ना, ते आपले दोष असतात की, आपण अभ्यास कमी केला असेल, आपण डायव्हर्ट झालो असेल. पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते. माझ्या घरामध्ये मला आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की, तू हे नाही करु शकत. त्यांना खूप आत्मविश्वास आहे. त्यात त्यांचा महत्वाचा रोल आहे. ते नेहमी मला पुश करत असतात. त्यामुळे मी सर्व माझ्या कुटुंबाचे, माझ्या मित्र, मैत्रणींचे खूप खूप आभार मानते”, असे दर्शना आपल्या शेवटच्या भाषणात म्हणाली होती.

Share This News

Related Post

पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Posted by - April 28, 2022 0
पुणे-सोलापूर महामार्गावर फुरसुंगी फाटा चौकात दोन कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर तिघांना लोणी काळभोरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल…
Pune News

पुणे अपघात प्रकरण : पबवर सरसकट कारवाई का? व्यावसायिक, वेटर्स, बाउन्सर्स, सप्लायर्सने घरं कशी चालवायची?; हॉटेल असोसिएशनने उपस्थित केले सवाल

Posted by - May 26, 2024 0
पुणे : पुण्याच्या कल्याण नगर मध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर अनेक सरकारी यंत्रणांना खडबडून जाग आली आहे. ज्या गोष्टी बेकायदेशीर…

पुणे महापालिका निवडणूक; 20 प्रभागांची नावे बदलली, जाणून घ्या कोणते आहेत हे प्रभाग

Posted by - May 17, 2022 0
पुणे – आगामी पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. राजकीय पक्षही निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. पुणे महापालिकेने…

Jio’s True 5G आता बंगळुरू आणि हैदराबादमध्ये लॉन्च

Posted by - November 11, 2022 0
मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, वाराणसी आणि नाथद्वारामध्ये जिओ ट्रू 5जी सेवांच्या यशस्वी बीटा-लाँचनंतर, जिओ ने बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये जिओ ट्रू…

‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा’ पुण्यात MPSC च्या हजारो विद्यार्थ्यांचं आंदोलन 

Posted by - January 13, 2023 0
पुणे : एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय असून, हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *