जगातील सर्वात उंचावरच्या युद्धभूमीवर दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती होणार विराजमान

535 0

पुणे- सियाचीन ही जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिक त्याठिकाणी देशाच्या सीमेचे रक्षण करत असतात. आता थेट तिथेच गणपती मूर्तीची स्थापना होणार असल्यामुळे सैनिकांना यामधून प्रेरणा मिळणार आहे

‘दगडूशेठ गणपती’च्या श्रींची प्रतिकात्मक मूर्ती एकता व अखंडतेचे प्रतीक असलेल्या भारतीय सैनिकांच्या सर्वधर्म स्थळामध्ये स्थापन करण्याची इच्छा बटालियनतर्फे व्यक्त केली होती. त्यानंतर ट्रस्टने त्यांच्या इच्छेला मान देऊन ‘श्रीं’ची हुबेहुब दोन फूटांची उंची प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. काश्मीर, अरुणाचल प्रदेश, पंजाब येथील सीमावर्ती भागांत भारतीय सैनिकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना केल्यानंतर, आता थेट सियाचीनमध्ये भारतीय सीमेवर सैनिकांच्या सर्वधर्म स्थळामध्ये दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्ती विराजमान होणार आहे.

ही मूर्ती पुण्यातील मूर्तीकार भालचंद्र देशमुख यांनी साकारली असून नुकतीच ही मूर्ती बटालियनच्या माऊली रेडेकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, विजय धनगर या जवानांकडे देण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना श्रींचं दर्शन घेता येत नाही. त्यामुळे २२ मराठा बटालियनचे लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये सर्वधर्म स्थळावर करण्याची इच्छा बटालियनच्यावतीने व्यक्त केली. भारतीय लष्करातील २२ मराठा बटालियनच्या सैनिकांकडे दगडूशेठ गणपतीची दोन फुटांची मूर्ती मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली.

Share This News

Related Post

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ जाहीर

Posted by - January 30, 2022 0
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर : मुरलीधर मोहोळ

Posted by - May 7, 2024 0
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी 70 टक्के ऐवजी 51 टक्के झोपडीधारकांची संमती, तीनशे चौरस फुटांचे…
crime news

स्पीकरच्या आवाजाच्या त्रासाने ज्येष्ठाने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 31, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघसडकीस आली आहे. यामध्ये एका 70 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीने बंडगार्डन नदी पुलावरून उडी मारून…
Pune Crime News

Pune Crime News : प्रियकरासाठी उचलले लाखो रुपयाचे कर्ज; मात्र हफ्ते न भरल्याने प्रेयसीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - September 16, 2023 0
पुणे : एकमेकांवर प्रेम असावं पण ते आंधळं नसावं. या आंधळ्या प्रेमापायी एखाद्याचे आयुष्यदेखील बरबाद होऊ शकते. याचाच प्रत्यय देणारी…

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं

Posted by - October 22, 2022 0
उध्दव ठाकरे यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर बऱ्याच दिवसापासून ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *