Dagdushet Ganpati

Dagdushet Ganpati : ‘दगडूशेठ’ गणपती प्राणप्रतिष्ठापना व आगमन मिरवणूक; RSS चे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते होणार श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना

289 0

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdushet Ganpati), सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला मंगळवार, दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उदघाटन सायंकाळी 7 वाजता होईल.

प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी 8.30 वाजता मुख्य मंदिरापासून हनुमान रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ आणि त्यावर श्री हनुमानाच्या 4 मूर्ती लावण्यात येणार आहेत. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी 12 पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Vishal Mane

पुण्यात पोलिस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Posted by - May 26, 2023 0
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police) अंतर्गत असलेल्या भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये (Bhosari MIDC Police Station) कार्यरत असणारे…
Meera Borwankar

Meera Borwankar : पोलिसांच्या जमिनीचा ‘दादा’ मंत्र्यांनी लिलाव केला; IPS मीरा बोरवणकरांचे खळबळजनक दावे

Posted by - October 15, 2023 0
पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांच्या जीवनावर आधारित मॅडम कमिश्नर हे पुस्तक प्रकाशित होत आहे.…

पुण्यात निवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा धक्का ! नगरसेविकेच्या पतीचा राष्ट्रवादीत प्रवेश

Posted by - February 5, 2022 0
पुणे महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा आराखडा सादर झाला आणि शहरातील राजकारण तापण्यास सुरू झाली. त्यातच आता शहरातील राजकारण तापण्यास सुरुवात…
Pune News Accident

Pune News Accident: आई – वडिलांचा आधार हरपला ! मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून घरी जाताना काळाने केला घात

Posted by - August 7, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना (Pune News Accident) घडली आहे. यामध्ये मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून रात्री दुचाकीवरून घरी…

पुणेकर घेणार मेट्रो प्रवासाचा आनंद ! दिवसाला किती मेट्रो धावणार ? जाणून घ्या वेळापत्रक

Posted by - March 2, 2022 0
पुणे- महामेट्रोचे पुण्यात पहिल्या टप्यातील मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या उदघाटनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अवघ्या सहा दिवसांत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *