Chandrakant Patil

Chandrakant Patil : पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

1431 0

पुणे : सध्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाचा परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.

खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राहूल कुल, अशोक पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील धरणाची स्थिती चांगली आहे. पुढील महिन्याभरात पावसाचे प्रमाण कसे राहते त्यावर लक्ष ठेऊन ऑक्टोबरमध्ये पुढील नियोजन ठरविण्यात येईल.

पवना व चासकमान मध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला असून भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या प्रकल्पांच्या पाणी नियोजनाबाबत कोणतीही अडचण नाही असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

नीरा प्रणालीत समाधानकारक पाणी
नीरा प्रणालीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 4 टीएमसी ने पाणीसाठा कमी असून उपयुक्त पाणीसाठा 91 टक्के आहे. सध्यातरी समाधानकारक पाणीसाठा आहे. तथापि, लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी समन्यायी पद्धतीने सर्वांना मिळेल यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

कालव्याच्या टेलच्या भागातील शेतीला योग्य दाबाने पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी कालवेक्षेत्रातील पाणी उपशावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यकता भासल्यास ठराविक वेळेतच वीजपुरवठा करा. अवैध पाणीवापरावर नियंत्रण आणण्यासाठी मनुष्यबळाचे फेरनियोजन करत इतर ठिकाणचे मनुष्यबळ सिंचन व्यवस्थापनावर वापरात आणावे. बाह्य स्रोताद्वारे तात्पुरते मनुष्यबळ घेण्यात यावे, अशा सूचना महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी केल्या.

नीरा डाव्या कालव्याद्वारे संरक्षित सिंचन पूर्ण होताच शेटफळ तलाव 50 टक्के भरण्याचे नियोजन आहे. सध्या नीरा उजवा कालवा आणि डावा कालव्याचे आवर्तन सुरू असून ते नियोजनाप्रमाणे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस आमदार समाधान अवताडे, शहाजीबापू पाटील आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

मशिदींवर काढून भोंगे करू नका तुम्ही सोंगे ; रामदास आठवले यांचा कवितेतून राज ठाकरेंना टोला 

Posted by - April 23, 2022 0
आधी गुढीपाडव्याच्या सभेत त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरे यांनी मशिंदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, नाहीतर मनसे दुप्पट आवाजात हनुमान…
Maratha Reservation

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

Posted by - January 24, 2024 0
पुणे : मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा…

चालताना धक्का लागला म्हणून भर रस्त्यात राडा; किरकोळ कारणातून आयुष्य झालं उध्वस्त !

Posted by - March 4, 2023 0
उल्हासनगर : रस्त्यावरून चालत जात असताना दारूच्या नशेत धक्का लागल्याने भर रस्त्यात दोघाजणांमध्ये वाद पेटला. हा वाद एवढा विकोपाला गेला…
Nashik News

Nashik News : पोलीस बनण्याचं स्वप्न राहिलं अधुरं; पोलिस भरतीचा सराव करताना तरुणाचा मृत्यू

Posted by - August 5, 2023 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पोलिस दलात भरतीचा सराव करणाऱ्या तरुणाचा मृत्यू…
Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर ‘त्या’ प्रकरणी दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल

Posted by - March 10, 2024 0
पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *