मुलीला कुत्रा चावला म्हणून महिलेने कुत्र्याच्या दोन पिल्लाना केलं ठार, पुण्यातील घटना

535 0

पुणे- मुलीला कुत्रा चावल्याच्या रागातून एका महिलेने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारलं. एवढंच नाहीतर सोसायटीतील एकाही कुत्र्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत ही महिला सोसायटीत काठी घेऊन फिरत होती. ही घटना हडपसर परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता दिलीप खाटपे (वय 45) असे आरोपी महिलेचे नाव असून याप्रकरणी नीता आनंद बीडलान (वय 43) या महिलेने तक्रार दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, अनिता खाटपे यांच्या लहान मुलीला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता. याचाच राग मनात भरून ही महिला सोसायटीतील एकच कुत्रा जिवंत ठेवणार नाही असे म्हणुन हातात मोठी काठी घेऊनच सोसायटीत फिरत होती.

या महिलेने दोन पिलांना काठीने बदडून ठार केले. त्यानंतरही दिसेल त्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न ही महिला करत होती. हातात काठी घेऊन फिरत असताना ही महिला अनेकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. कुत्र्याला का मारता अशी विचारणा केली असता त्यांनी सुरक्षा रक्षकासोबत अरेरावी केली.

कुत्र्याच्या दोन पिल्लाना या महिलेने ठार केल्याचे समजताच सोसायटीमधील एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे श्वानप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हडपसर पोलीस तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Rajnikant

Rajinikanth : वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी रजनीकांतच्या नातवावर ट्रॅफिक पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

Posted by - November 20, 2023 0
दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) यांचा नातू आणि धनुषचा मोठा मुलगा यात्रा राजाला ट्रॅफिक पोलिसांनी दंड आकारला आहे. यात्रा हा आता…

#HEALTH WEALTH : दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी टिप्स; चांगले आणि दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर या सवयी ताबडतोब अंगीकारा

Posted by - March 25, 2023 0
आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर आणि मन निरोगी असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी निरोगी आहार, व्यायाम आणि निरोगी सवयी पाळणे आवश्यक…
Sanjay Kakde

Sanjay Kakde : माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत वाढ! कर्ज बुडविल्याप्रकरणी कोर्टाकडून कंपनीचे शेअर्स विकण्याचे आदेश

Posted by - June 29, 2023 0
पुणे : भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीचे कर्ज…
Dasra

Kasba Ganapati : श्री कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शाही दसऱ्याचे आयोजन

Posted by - October 25, 2023 0
पुणे : विजयादशमीच्या निम्मित श्री कसबा गणपती (Kasba Ganapati) चौक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पारंपरिक शस्त्रपूजन व सोने लुटण्याचा कार्यक्रम…

ऑनलाईन कॅब अग्रेगटर साठी श्रीवास्तव समितीकडं पाठवले तब्बल ‘इतके’ हजार अभिप्राय

Posted by - May 13, 2023 0
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड मधून 20,000 रिक्षाचालकांनी व नागरिकांनी ऑनलाईन कॅब अग्रेगटर बाबत महाराष्ट्र राज्यासाठी कायदा बनवणाऱ्या सुधीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *