धक्कादायक ! जमिनीवर नाक घासायला लावल्याच्या कारणावरून तरुणाने घेतला गळफास

659 0

पुण्यातील दिघीमध्ये चार जणांनी बेदम मारहाण करत जमिनीवर नाक घासायला लावल्याच्या कारणावरून एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. सचिन तळेकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी दिघी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

या प्रकरणी किरण रामदास कान्हूरकर, विजय दत्तात्रय तापकीर, अमोल बाळासाहेब तापकीर, अभिनव अर्जुन गायकवाड यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज दिगंबर ढोले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन तळेकर हा महानगरपालिकेच्या शाळेत वॉचमनची नोकरी करतो. त्याला महानगरपालिकेतील जॉबविषयी माहिती असायची. त्यामुळे आरोपी विजयने नोकरीसाठी आपली नातेवाईक प्राजक्ता यांचे कागदपत्र सचिनला व्हॉट्सअॅपवर पाठवले. यानंतर प्राजक्ता यांनीही सचिनला फोन केला आणि नोकरीविषयी बोलायचं असून शाळेवरती थांबण्यास सांगितलं.

तसेच माझ्यासोबत पती आणि इतर नातेवाईक येत आहेत असंही नमूद केलं. प्राजक्ता यांनी सचिनला असं सांगितल्यानंतर सचिनने तुम्हाला एकट्याला भेटायचं आहे असं उत्तर दिलं. याबाबत प्राजक्त यांनी नातेवाईक आणि पतीला माहिती दिली. सचिनच्या म्हणण्याचा उलट अर्थ काढून चार जणांनी मिळून सचिन तळेकरला बेदम मारहाण केली. तसेच जमिनीवर नाक घासण्यास सांगितले. यानंतर पीडित सचिनने त्याच दिवशी घरी येऊन टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली.

Share This News

Related Post

Breking News ! पुणे रेल्वे स्थानकावर आढळली बाँब सदृश्य वस्तू

Posted by - May 13, 2022 0
पुणे- पुणे रेल्वे स्थानकावर बाँब सदृश्य वस्तू आढळली असून खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 पूर्णपणे रिकामे करण्यात…
Pune Firing

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Posted by - April 18, 2024 0
पुणे : आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा पुणे हादरलं (Pune Firing) आहे. दोन दिवसात तीन गोळीबाराच्या घटना घडल्याने लोकांमध्ये भीतीचे…
heavy Rain

Heavy Rain Pune: पुण्यात येत्या 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

Posted by - May 8, 2023 0
पुणे : रविवारी पुणे शहरात काही ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. तसेच आजदेखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा…

माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा, चंद्रकांत पाटील यांना इशारा

Posted by - May 27, 2022 0
पुणे – खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *