anil Ramod

रामोड कुटुंबीयांच्या खात्यात 47 लाखापेक्षा जास्त रक्कम; CBI तपासात आले समोर

658 0

पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड (Dr. Anil Ramod) व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने असलेल्या 17 बँक खात्यांमध्ये 47 लाखापेक्षा अधिक रक्कम असल्याचे समोर आले आहे. डॉ. रामोड यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मात्र ते तपासास सहकार्य करत नसल्याची माहिती CBI ने न्यायालयास दिली आहे. डॉ. रामोड यांना मंगळवारी सीबीआय (CBI) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्या कोठडीसाठी सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये सीबीआयने ही माहिती दिली.

रामोड कुटुंबीयांच्या नावे बँकेत असलेली रक्कम कुठून आली? त्यांची आणखी कुठे बेकायदेशीर मालमत्ता व रक्कम आहे का? याची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. आरोपीचे कार्यालय व इतर ठिकाणाहून पुरावे जमा करायचे असल्याने त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केली आहे. यानंतर न्यायालायने ही विनंती मान्य करून सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. एस. वाघमारे यांनी रामोड यांना 27 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे रामोड याची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

पुणे : भोई प्रतिष्ठानच्या वतीने अग्निशमन दलासोबत भाऊबीज साजरी

Posted by - October 27, 2022 0
पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध भोई प्रतिष्ठानच्या वतीने अग्निशमन दलाचे जवानांना ओवाळून भाऊबीज साजरी करण्यात आली. यंदा या उपक्रमाचे 27 वे…

महत्वाची बातमी : खडकवासला धरणातून 13,142 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग;भिडे पूल पाण्याखाली,पहा थेट दृश्य (Video)

Posted by - July 12, 2022 0
पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा ११,९०० क्युसेक विसर्ग वाढवून मंगळवारी संध्याकाळी…
Sharad Pawar

Ajit Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांकडे किती आमदार शिल्लक ? पहिला आकडा आला समोर

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : काल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह बंड केल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी…

राष्ट्रवादी काँग्रेसने मागवले इच्छुक उमेदवारांचे अर्ज

Posted by - February 16, 2022 0
पुणे- आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली असून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर…
Rupali Chakankar

बेपत्ता महिलांच्या तपासासाठी समिती स्थापन करत शोध मोहिम राबवावी : रुपाली चाकणकर

Posted by - May 15, 2023 0
मुंबई : राज्यातील महिला व मुली बेपत्ता होण्याची गेल्या काही महिन्यांतील आकडेवारी चिंताजनक असून या महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने समिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *