अजित पवारांच्या बालेकिल्लाला तडा! पुण्यातील तब्बल ‘इतके’ नगरसेवक करणार शरद पवार गटात घरवापसी

578 0

देशातील लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर केंद्रात एनडीए ला तर राज्यात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटामध्ये मोठी खलबतं सुरू आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील जनतेचा कौल महाविकास आघाडीला मिळू शकतो या विचाराने अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक हे शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे पुणे शहरात असलेली शरद पवार गटाची ताकद आणखी वाढणार असून अजित पवार गटाला मात्र कार्यकर्ते पदाधिकारी टिकवून ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यादरम्यान पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी आहे, पिंपरी चिंचवड मधील काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली पक्षप्रवेशा बाबत चर्चा केली असल्याचे सूत्रांची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोठा प्रभाव आहे. मात्र याच पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी अजित पवार गटचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 16 नगरसेवकांनी शनिवारी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशा संदर्भातील काही चर्चा झाल्या आहेत. दरम्यान आज पुन्हा नेते विलास लांडेंच्या उपस्थितीमध्ये हे सर्व जण शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये पक्षप्रवेशाची अंतिम चर्चा होऊन येत्या पाच जुलैला हे सगळे नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. मात्र असे झाल्यास अजित पवार यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे.

पक्षप्रवेशावर काय म्हणाले शरद पवार?

दरम्यान या सगळ्या घटनेवर बोलताना शरद पवार यांनी मला रोजच विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते हे भेटायला येत आहेत. त्यामुळे जे पक्षात येत असतील त्यांचं स्वागतच आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी देखील घर वापसीचे सकारात्मक संकेत दिले आहेत.‌

Share This News

Related Post

Dr Ajay Taware

Dr Ajay Taware : ब्लड फेरफार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले डॉ. अजय तावरे नेमके कोण आहेत?

Posted by - May 29, 2024 0
पुणे : पुणे अपघात प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट (Dr Ajay Taware) पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात रोज आरोपींच्या संख्येत…

मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर अखेर आले समोर, म्हणाले..

Posted by - May 5, 2022 0
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. ४ तारखेला पोलिसांनी मनसे पदाधिकारी…

आज लक्ष्मीपूजन; जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचे शुभमुहूर्त

Posted by - October 24, 2022 0
आली माझ्या घरी ही दिवाळी. नरकचतुर्दशी या दीपावलीतील मुख्य सणाच्या दिवसाबरोबर आज, सोमवारी (दि.२४) लक्ष्मीपूजन हा दीपोत्सवातील उत्सव येत आहे.…

गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल; वाचा काय आहे प्रकरण?

Posted by - May 23, 2022 0
गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे  पुन्हा एकदा नव्या वादाने चर्चेत आले आहेत. गुट्टे यांच्यावर आता गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. कारण…
Delhi Fire

दिल्लीतील कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांनी चौथ्या मजल्यावरुन मारल्या उड्या

Posted by - June 15, 2023 0
नवी दिल्ली : दिल्लीतील मुखर्जी नगरमधील बत्रा सिनेमाजवळील ज्ञाना इमारतीला आग (Fire) लागली आहे. या इमारतीत अनेक कोचिंग सेंटर्स (Coaching…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *