Punit Balan

Punit Balan : कंटेंट क्रिएटर्सनी देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे : पुनीत बालन

225 0

पुणे : मतदाराच्या एका मतात सरकार बदलण्याची किंवा स्थापन करण्याची ताकद असते. अधिकाधिक मतदारांनी या ताकदीचा वापर करावा यासाठी कंटेट क्रिएटर्सनी मतदानाबाबत जागृती करुन देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे, असे आवाहन ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केले.

मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘पुनीत बालन ग्रुप’तर्फे पुण्यात ‘वन क्लिक वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड क्रियेटर्स मिट’चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार श्री मुरलीधर मोहोळ, लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांच्यासह मोठ्या संख्येने कंटेट क्रिएटर उपस्थित होते. सध्या सोशल मिडीयाची ताकद प्रचंड असून तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरीक सोशल मिडियाचा एक भाग बनले आहेत. या ताकदीचा वापर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोशल मिडियातील कंटेट क्रिएटर्सनी सक्रिय योगदान देण्याची गरज असल्याचे मत पुनीत बालन यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार श्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘‘सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांशी संवाद होतो. त्यांचे प्रश्न जाणून घेता येतात आणि त्यावर उपाययोजनाही करता येतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता म्हणून अधिक प्रभावी काम करता येते.’’ यावेळी त्यांनी मतदानाबद्दल जागृती करण्याचेही आवाहन केले.

मतदान जनजागृतीसाठी कंटेट क्रिएटर्ससोबत सहभाग घेणार असल्याचे लेखक-दिग्दर्शक-अभिनेते श्री प्रवीण तरडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘चित्रपट पोहोचवण्यासाठी क्रियेटर्स यांची भूमिका सध्या अत्यंत महत्त्वाची आहे. काही सेकंदाच्या कंटेंटमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम अवघड असते. परंतु कंटेट क्रिएटर्स आपल्या प्रतिभेतून आणि निरीक्षण शक्तीद्वारे हे काम सहज करु शकतात. असेच काम त्यांनी मतदानाबाबत जागृती करण्यासाठी केले तर ते राष्ट्रीय कार्य होईल, यात काही शंका नाही.’’

‘‘सोशल मिडियाच्या माध्यमातून कंटेट क्रिएटर्सनी लोकांमध्ये सकारात्मकता पसरवणे गरजेचं आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे लोकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती केली तर मतदानाचे प्रमाण वाढेल आणि या मतदानाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना देशाच्या विकासाचे भागीदारही बनता येईल. तसेच मतदारांनीही मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून घरी न बसता जागरूक नागरिक म्हणून मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं. तरंच त्यांना सरकारवर बोलण्याचा अधिकार उरेल.’’
– पुनीत बालन
(अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)

Share This News

Related Post

पुण्यात वातावरण तापले : वंचित बहुजन आघाडीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र निदर्शने

Posted by - December 10, 2022 0
पुणे : आज कोथरूडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र निदर्शने केली आहेत. चंद्रकांत पाटील यांनी…
Death of Trekker

Death of Trekker : हरिशचंद्र गडावर गेलेल्या त्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कसा झाला? 2 दिवसांनी समोर आलं धक्कादायक कारण

Posted by - August 9, 2023 0
नाशिक : सध्या पावसाळा सुरु असल्याने अनेक पर्यटन स्थळी पर्यटकांची मोठ्या (Death of Trekker) प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. पावसाळी…

पुणे महानगरपालिका : राष्टध्वजाचा अपमान करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा – ऋषिकेश बालगुडे

Posted by - August 18, 2022 0
पुणे : केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनच्या आदेशानुसार १५ ऑगस्ट २०२२ अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पुणे महानगरपालिका भांडार विभाग अंतर्गत…

#FIRE CALL : पिरंगुटमधील सुजनील केमिको कंपनीमध्ये आगीची घटना

Posted by - February 20, 2023 0
पुणे : पिरंगुटमधील सुजल केमिको कंपनीला आज दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागली होती. दरम्यान पीएमआरडीए अग्निशमन केंद्र मारुंजी आणि…
Kolhapur Accident

Kolhapur Accident : कोल्हापूर रस्त्यावर अपघाताचा थरार; शासकीय गाडीची 10 बाईक, 2 कारना धडक

Posted by - October 19, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *