पुण्यात विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षाची गळफास घेऊन आत्महत्या

636 0

पुणे शहरातील विश्रांतवाडी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विकास शिवाजी टिंगरे यांनी आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्मCrime Neहत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईला एक चिठ्ठी लिहिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, विकास टिंगरे हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. टिंगरे यांचे पोरवाल रस्त्यावर एका पतसंस्थेच्या शेजारील इमारतीमध्ये कार्यालय आहे. त्याठिकाणी ते रोज जेवण मागवत असत. काल मंगळवारी त्यांनी जेवण मागवले नाही म्हणून नेहमी जेवण आणून देणारा त्यांचा नोकर कार्यालयात आला असता टिंगरे यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी धाव घेतली. टिंगरे यांनी मृत्यूपूर्वी आईला चिठ्ठी लिहिली असून अद्याप ती चिठ्ठी पोलिसांनी उघडलेली नाही. त्या चिठ्ठीतून त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर येऊ शकते असे पोलिसांनी सांगितले.

Share This News

Related Post

ससून हॉस्पिटल ड्रग्सप्रकरणी पुणे पोलिसांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - October 6, 2023 0
ससून ड्रग्ज प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून तपास केला जात आहे. यामध्ये ज्यांचा सहभाग असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं पुणे…

मोठी बातमी : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला; हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू

Posted by - March 3, 2023 0
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर चार अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकला बाहेर पडले…
Crime

पिंपरी चिंचवड मधील पर्यटकांवर दापोलीत हल्ला ;कोयत्याने केले वार

Posted by - May 16, 2022 0
दापोली- हर्णै समुद्र किनाऱ्यावर गाडी उभी करण्याच्या वादावरून पिंपरी चिंचवड मधील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने…
Rupali Chakankar

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Posted by - May 8, 2024 0
पुणे : देशासह राज्यातील 11 मतदारसंघात काल लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे…

अखेर नितेश राणे सिंधुदुर्ग न्यायालयासमोर शरण, नितेश राणे यांचे सूचक ट्विट

Posted by - February 2, 2022 0
कणकवली- भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला असून त्यांनी कणकवली न्यायालयासमोर शरणागती पत्करली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *