शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

392 0

देशाचे नेते आदरणीय खा. शरदचं पवारसाहेब यांच्या मुंबई येथील निवासस्थानी महाराष्ट्राच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज पुण्यात कॅम्प येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाच्या वेळी शरद पवारांच्या घरावर ज्या हल्लेखोरांनी हल्ला त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी काँग्रेस कडून करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले.
याआंदोलनाला माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक अविनाश बागवे, नगरसेवक अभय छाजेड, नगरसेवक आबा बागुल, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, काँग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्ष पूजा आनंद, पुणे शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश बागवे म्हणाले,एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा विषय हा पूर्णपणे न्यायप्रविष्ट असताना तसेच आदरणीय शरद पवार यांचा याविषयाशी काहीही संबंध नसताना निव्वळ विरोधी पक्ष भाजप व भाजपचे प्रवक्ते असणारे वकील गुणरत्न सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. शरद पवार साहेबांनी एसटी कर्मचाऱ्यांरेची
वर्षानुवर्षे काळजी केली. त्यात शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. एसटी कर्मचाऱ्यांना भाजप पाठीशी घालत आहे भाजप
एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून हे कारस्थान करत आहे. महा विकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न हेसोडवण्याचा प्रयत्न केला. हा जो परवा प्रकार घडला तो महाराष्ट्राला शोभणारा नाही.
शरद पवारांच्या घरावर ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी
यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत .असे रमेश बागवे म्हणाले.

Share This News

Related Post

कसब्याची चर्चा काही थांबेना ! रुपाली पाटलांनी घेतलेल्या भूमिकेवर तृप्ती देसाईंनी उघडलं तोंड… पाहा VIDEO

Posted by - December 28, 2022 0
पुणे : दादागिरीची आणि शिवराळ भाषा करणाऱ्यांना राष्ट्रवादी तिकीट देईल, असं मला तरी वाटत नसल्याचा आरोप करत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष…
Meri Mati Mera Desh

Meri Mati Mera Desh : ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाला राज्यभर मोठा प्रतिसाद

Posted by - September 7, 2023 0
‘मेरी माटी मेरा देश’ या महाअभियानाला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अभियानाचे प्रदेश संयोजक राजेश पांडे यांनी आज पत्रकार…
Congress

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

Posted by - April 29, 2024 0
मुंबई : अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील (Maharashtra Politics) यांनी रविवारी 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश…

पुणे शहरात हाय अलर्ट..! कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्या, पुणे महापालिकेचे खासगी आस्थापनांना आवाहन

Posted by - July 13, 2022 0
पुणे : पुणे शहर आणि परिसराला येत्या 48 तासात अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *