नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा – चंद्रकांत पाटील

239 0

कोथरूड मतदारसंघातील औंध, बाणेर, बावधन भागातील पावसाळापूर्व कामांचा आढावा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज घेतला. पावसाळा पूर्व कामांतील नालेसफाईची आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना आज चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, मलनिःसारण विभागाचे अधिक्षक अभियंता दिनकर गोजरे, पाणीपुरवठा विभागाचे नंदकिशोर जगताप, उपायुक्त परिमंडळ क्रमांक.२ चे उपायुक्त गणेश सोनूने, बाणेर- औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, कोथरूड-बावधनचे सहाय्यक आयुक्त केदार वझे, भाजपा शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरूड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्या सह महापालिकेच्या विविध खात्याचे अधिकारी तसेच माजी नगरसेवक अमोल बालवडकर, दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे पाटील, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अल्पना वर्पे, छाया मारणे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक, भाजपा नेते दिनेश माथवड, राहुल कोकाटे उपस्थित होते.

या बैठकीत नामदार पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील बाणेर-औंध क्षेत्रीय कार्यालय आणि कोथरुड- बावधन क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.‌

नाले साफ सफाई संदर्भात अपूर्ण असलेल्या ठिकाणी कामे करून घेण्यात यावी. तसेच, आवश्यकता असलेल्या ठिकाणी नाल्यांचे खोलीकरण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. यासोबतच पावसामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणची पाहाणी करून योग्य ती उपययोजना कराव्यात आदी सूचना त्यांनी या बैठकीत केल्या.

तसेच, महापालिकेच्या वतीने अनेक भागात पिण्याच्या पाण्याच्या आणि ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदाई करण्यात आली आहे. मात्र त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे तयार झालेल्या खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता, पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत आदी सूचना दिल्या.

त्यासोबतच पथ दिव्यांची देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. याशिवाय धोकादायक झाडांच्या फांद्यांची वेळीच छाटणी करुन, कचरा उचलण्यात यावा. तसेच, पदपथ तथा मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करुन, अतिक्रमणमुक्त पदपथ करावेत, आदी सूचना देखील या बैठकीत दिल्या.

Share This News

Related Post

‘जेष्ठ नागरीक रेल्वेभाडे सवलत’ बंद केल्याबाबत मोदी सरकारचा तीव्र निषेध- गोपाळ तिवारी

Posted by - March 18, 2022 0
भारतीय रेल्वेद्वारे ५८ वर्षांवरील महिला आणि ६० वर्षांवरील पुरुष प्रवाशांना केंद्र सरकार  रेल्वे भाड्यात सवलत देत असे. प्रवाशांना दिलेल्या ‘सवलतीचा…

तीन मिनिटात 180 कोटीची विकासकामे मंजूर, पिंपरी महापालिका स्थायीचा पराक्रम

Posted by - March 2, 2022 0
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने अवघ्या तीन मिनिटाच्या ऑनलाइन सभेत 180 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहेत. निवडणूक निधी उभारण्यासाठी…

नागरिकांना सेवा पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि कालबद्धरितीने उपलब्ध कराव्यात- राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे

Posted by - July 26, 2022 0
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना कायद्याने मिळणे अपेक्षित असलेली सेवा पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि त्याचबरोबर विहित केलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *