को -ऑपरेटीव्ह संस्था कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उपयोगी पडतात – खासदार श्रीरंग बारणे

189 0

पुणे : पुण्यनगरी ही अशी जागा आहे जिथे कोणीही उपाशी झोपले नाही. या शहाराने कोणाला तसे झोपू ही दिले नाही. मी इथला भूमीपुत्र आहे. इथल्या कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी, अर्थ सहाय्य करण्यासाठी  को -ऑपरेटीव्ह संस्था उपयोगी पडतात, असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी आज व्यक्त केले.

गुरूकृपा मल्टिपर्पस (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेचा शुभारंभ आज खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिव व्याख्याते नामदेवराव जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, गुरूकृपा मल्टिपर्पस (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटीच्या चेअरमन श्रावणी संतोष चव्हाण आणि एस स्क्वेअर एंटरटेनमेंट आणि सर्वज्ञ नाट्य संस्थेचे अध्यक्ष  संतोष चव्हाण, सहकार आयुक्त पुणे अनिल कवडे,  पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, आमदार सुनील शेळके, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी नगरसेविका सुमन पवळे, माजी नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, शांताराम द. भालेकर, शांताराम को. भालेकर आदी मान्यवर  उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, सर्व सामान्य नागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी शहराच्या विविध भागात अशा प्रकारच्या संस्था कार्यरत आहेत. गरजू व्यक्तींना कर्जाच्या माध्यमातून मदत करत असतात. संतोष चव्हाण यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. भूमीपुत्र या नात्याने जी काही मदत लागेल ती मी करेल.

मेघराजराजे भोसले म्हणाले, चित्रपट, नाट्य निर्माते संतोष चव्हाण यांनी कोरोना काळात कलाकारांसाठी मोठे काम केले आहे. कलावंतांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे चव्हाण आता  सर्वसामान्य नागरिकांसाठी पतसंस्थेच्या माध्यमातून पुढे येत आहेत. एस स्क्वेअर एंटरटेनमेंट आणि सर्वज्ञ नाट्य संस्थेचे अध्यक्ष  संतोष चव्हाण म्हणाले, सर्वसामान्य आणि गरजु लोकांसाठी गुरूकृपा मल्टिपर्पस (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटी काम करेल. कलाकार आणि तंत्रज्ञ याच्या पाठीशी उभे राहण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

Share This News

Related Post

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी

Posted by - March 24, 2022 0
पुणे- १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार झाल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून…

TOP NEWS MARATHI LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद देण्याचा शब्द दिला आहे…” मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी आमदार बच्चू कडू LIVE

Posted by - November 3, 2022 0
मुंबई : मंत्रीपद नाही मिळालं तरी काहीच अडचण नाही. मंत्रिपदासाठी बच्चू कडू मरमर करतात असा काही विषय नाही. पण मंत्रिपद…

औषधाच्या नावाखाली सुरू होती मद्यविक्री; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत धक्कादायक प्रकार उघडकीस

Posted by - April 25, 2023 0
पुणे: मागील काही दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क विभाग अँक्शन मोडवर आला असून पुणे जिल्ह्यात मोठा कारवाईचा धडाका पहायला मिळत आहे.…
Pune Porsche Car Accident

Pune Porsche Car Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

Posted by - May 27, 2024 0
पुणे : पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) आता एक मोठी घडामोड समोर आली आहे. यामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *