‘सिटी वेस्ट टू सिटी बस’ उपक्रमास सुरुवात; बायोसीएनजीवर पीएमपीएमएलच्या दोन गाड्या धावणार

192 0

पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ओल्या कचऱ्यापासून इंधन निर्मीतीचा प्रकल्प सुस रस्ता येथे उभारण्यात आला आहे.ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक बायोसीएनजीवर पीएमपीएमएलच्या दोन गाड्या धावणार आहेत.

‘सिटी वेस्ट टू सिटी बस’ या उपक्रमाअंतर्गत निगडी ते लोणावळा या मार्गावर या गाड्या धावणार आहेत.या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या सीबीजी इंधनापासून पीएमपीएमएलच्या गाड्या चालवण्याचं नियोजन होतं.त्यानुसार या उपक्रमाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार ,रवींद्र बिनवडे यांच्यासह पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या उपस्थित प्रारंभ झाला.टप्प्याटप्प्याने दैनंदिन सुमारे १०० गाड्या बायोसीएनजीवर धावतील असा दावा पीएमपीएमएल व महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.बायोसीएनजीवर धावणाऱ्या गाड्यांची चाचणी टाटा मोटर्स, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन इंडिया, व्हेईकल ॲन्ड रिसर्च डेव्हलमेंट एस्टॅब्लिशमेंट यांनी केली आहे. सध्या निगडी ते लोणावळा या मार्गावर दोन गाड्या धावणार आहेत. पीएमपी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, मे. नोबेल एक्स्चेंज यांच्या संयुक्त विद्यमानाने सिटी वेस्ट टू सिटी बस हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Share This News

Related Post

Mahayuti

Maharashtra Politics : विधानसभेसाठी मनसेनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

Posted by - June 12, 2024 0
मुंबई : राज्याच्या राजकारणातून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त…

मनसेचा उद्या पदाधिकारी मेळावा; राज ठाकरे करणार मार्गदर्शन

Posted by - May 27, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून सभांचा धडका लावला आहे. तसंच राज यांनी पक्षवाढीच्या हालचालींना देखील…
Dhananjay Munde

Ajit Pawar : राष्ट्रवादीचं नाव अन् चिन्ह मिळताच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Posted by - February 11, 2024 0
पुणे : आज पुण्यात राष्ट्रवादीचा युवक मेळावा पार पडत आहे, या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच…
Pimpri Chinchwad Fire

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Posted by - December 8, 2023 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून (Pimpri Chinchwad Fire) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.…

पुण्यातील प्राध्यापिका झाल्या जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू

Posted by - February 7, 2022 0
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका शांतिश्री धुलिपूडी पंडित यांची दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) कुलगुरू म्हणून निवड करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *