Neelam Gorhe

मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार

3987 0

 

 

पुणे दि.३१: पुणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार असल्याचे विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

पुणे येथील शिवसेना भवन येथे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार सहकाऱ्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख श्री प्रमोद नाना भानगिरे, शिवसेना महिला पुणे शहर प्रमुख पूजा रावेतकर, सुधीर कुरूमकर, शिवसेना महिला पुणे जिल्हाप्रमुख कांता पांढरे, अॅड.गितांजली ढोणे , सीमा कल्याणकर, सारिका पवार , रंजना कुलकर्णी शिवसेना पुणे जिल्हा महिला समन्वयक, शर्मिला येवले यांसह अन्य मान्यवर, शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुण्याची वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतं आहे. शहरात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होत असून त्याठिकाणी असलेला राडा रोडा, धूळ ताबडतोब हटवावी. मेट्रोच्यावतीने नेमण्यात आलेले वॉर्डन्सची संख्या वाढवली पाहिजे, त्यांना गणवेश दिला पाहिजे. तसेच स्थानिक प्रशासनाने शहरातील नव्याने वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊन त्याचा समावेश वाहतूक कोंडीच्या यादीत केला पाहिजे.

तसेच लवकरच पुणे जिल्हा नियोजन निधीला अंतिम स्वरूप मिळणार आहे. पुणे शहरासह ग्रामीणसाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यभर जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. पुणे शहर जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी श्री दगडूशेठ हलवाई गणपती सकाळी ८ वा मंदिरात महाआरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.८ व ९ फेब्रुवारी रोजी शहरात रूग्ण सेवा , ज्येष्ठांचे सत्कार ई विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
——

Share This News

Related Post

Pune Video

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Posted by - December 25, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune Video) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका चिमुकल्यावर तीन भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे.…

धक्कादायक : खराडीत खडक फोडण्यासाठी लावलेल्या सुरुंगाचा स्फोट ; एका मजुराचा मृत्यू, एक जखमी

Posted by - February 7, 2023 0
पुणे : बांधकाम प्रकल्पात खोदकाम केल्यानंतर सापडलेला खडक फोडण्यासाठी लावण्यात आलेल्या सुरुंगाचा स्फोट होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर उडालेले दगड लागून…

शाहरुख खान थुंकला की फुंकर मारली ? ट्रोलर्सकडून नवा वाद

Posted by - February 7, 2022 0
मुंबई- ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं काल निधन झालं. मुंबईतील शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलीवूडचा प्रसिद्ध…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

Posted by - December 22, 2022 0
मुंबई : ‘लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेलं एक लढवय्ये नेतृत्व आपण आज गमावलं,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार मुक्ता…

महाविकास आघाडीचा महामोर्चा; मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अडीच हजार पोलीस तैनात

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि समविचारी संघटनांकडून मुंबई महामोर्चाच आयोजन करण्यात आलं असून उद्धव ठाकरे अजित पवार आणि नाना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *