रघुनाथ कुचिक प्रकरणी माझ्यावरील आरोप धादांत खोटे, चित्रा वाघ यांचे पुणे पोलिसांना पत्र

526 0

मुंबई- शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत, असं स्पष्टीकरण भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिले आहे. या संदर्भात चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भपात करायला लावल्याचा आरोप केला होता. त्या पीडितेने देखील याबाबत पुणे पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र काही दिवसांपुर्वी ही तक्रार करण्यासाठी चित्रा वाघ यांनी आपल्यावर दबाव आणला असल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने केल्यामुळे पुन्हा या प्रकरणाला वेगळ वळण मिळाले. त्यानंतर महाविकास आघाडीमधील महिला नेत्यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती.

याबाबत आच चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहिलं आहे. मी पीडितेला सर्वतोपरी मदतचं केली. तरीही माझ्यावरच खोटे आरोप करण्यात आले आहेत. ती एकटी पडली असेल म्हणून मी तिला मदत केली. मात्र माझ्यावरच आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप धादांत खोटे असून याची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

माझ्यावर आरोप करण्यासाठी पीडितेवर आरोप करायला दबाव टाकला जात असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला असून कुचिक यांचा जामीन रद्द करण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केला आहे. पोलीस सखोल चौकशी करतील ही अपेक्षा असल्याचंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.

काय आहे प्रकरण ?

पीडित तरुणीने रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला तसेच जबरदस्तीने आपला गर्भपात केला असा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. या प्रकरणानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यासह आठ जणांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 19 फेब्रुवारी रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या पीडितेनं भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून आपण रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दिल्याचं खळबळजनक दावा केल्यामुळे प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे.

Share This News

Related Post

SSC Result Date

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Posted by - May 22, 2024 0
पुणे : बरावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला आहे. त्यापाठोपाठ आता लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना दहावीच्या निकालाची (SSC Result…
Dhule Crime

भरधाव कारने दिलेल्या धडकेत इंजिनिअर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 29, 2023 0
धुळे : धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका इंजिनिअर तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये शेतात…

पुणेकरांनो ! बुधवारी आणि गुरुवारी पाणी येणार नाही ; शहराच्या कोणत्या भागात पाणीपुरवठा राहणार बंद ? वाचा ही बातमी

Posted by - February 13, 2023 0
पुणे : पुणे महापालिकेकडून समान पाणी योजनेअंतर्गत पाण्याचे ऑडिट करण्यासाठी शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार असून बुधवार दिनांक…
Junnar News

Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत

Posted by - May 4, 2024 0
जुन्नर : बैलगाडा शर्यतीचा थरार पुण्यातील जुन्नर (Junnar News) येथे पाहायला मिळाला. या शर्यतीदरम्यान एक थरारक घटना समोर आली. यामध्ये…
Vasant More

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला…; वसंत मोरेंच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Posted by - March 12, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून (Vasant More) मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती, महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *