Chitra Wagh

Chitra Wagh : राजकीय रंग द्यायचा नाही म्हणता… चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

548 0

पुणे : सध्या राज्यात जालना येथील मराठ्यांच्या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. यादरम्यान आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?
राजकीय रंग द्यायचा नाही म्हणता…पण नेमकं तेच करून सामाजिक सलोख्याचा तुम्ही बेरंग करताय उद्धवजी!

आरक्षण प्रामाणिकपणे दिले म्हणता… पण न्यायालयीन कसोटीवर ते टिकणार नाही, अशी फट ठेवण्याचा अप्रामाणिकपणा कसा केलात उद्धवजी?

तुमच्यावेळी लाठ्या उगारण्याची वेळ आली नाही म्हणता… आंदोलनकर्त्या एसटी कामगारांवर पडल्या, त्या काय होत्या उद्धवजी?

सणांच्या दिवसांत अधिवेशन ठेवून आम्ही सणांना आडवं जातो म्हणता… पण मग तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवळं बंद ठेवून भक्तांना कसे आडवे गेलात तुम्ही उद्धवजी?

आम्हाला एक फुल- दोन हाफ आणि कारभार शून्य म्हणता… तुम्ही तर अडीच वर्षांत मंत्रालयाची पायरीही चढला नाहीत उद्धवजी!

अजूनही स्वत:ची कुवत न ओळखता महाराष्ट्र उभा करतो म्हणता…तुम्ही तर तुमचा आख्खा पक्षच बसवला उद्धवजी!

आज शांतीत भेटायला आलोय, असं म्हणता…मग उद्या पेटवण्याची भाषा कशाला उद्धवजी?
.
.
.
बात निकलेगी तो बहोत दूर तक जाएगी उद्धवजी…!

Share This News

Related Post

अंधेरीत ‘नोटा’ चालला म्हणून पुण्यात फुटले फटाके? कोथरूडमध्ये मतदारांच्या आभाराचा बॅनर, पेढे वाटप ! VIDEO

Posted by - November 7, 2022 0
पुणे : काल रविवारी तिकडं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत NOTA ला 12 हजारांच्या वर मतं मिळाली म्हणून इकडं पुण्यात चक्क…
Kavita Dwivedi

Baramati News : बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी तयारी पूर्ण: निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी

Posted by - May 4, 2024 0
बारामती : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून मतदानाच्यादृष्टीने मतदार संघातील सर्व तयारी…

Maharashtra Politics : शिवसेनेचे खासदार-आमदार शिंदे गटात, परंतु कार्यकर्ते पक्षप्रमुखांबरोबर

Posted by - July 23, 2022 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार त्यांच्या गोटात गेल्यानंतरही शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक मात्र अजूनही शिवसेनेतच…
Vasant More

Vasant More : ‘….अपमान किती सहन करायचा’, ‘मनसे’चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - March 12, 2024 0
पुणे : मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी पक्षाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *