Pimpari Chinchwad News

Pimpari Chinchwad News : पिंपरीमध्ये चालत्या ओमनी कारने घेतला पेट

451 0

पिंपरी चिंचवड : आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास भोसरीतील एचपी पेट्रोल पंपा जवळ (Pimpari Chinchwad News) सीएनजीवर चालणाऱ्या मारुती सुझुकी ओमनी या कारने अचानक पेट घेतला. चालकांनं वेळीच प्रसंगावधान दाखवत गाडी थांबवल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एमएच 12/एएक्स 5787 ही ओमनी कार थरमॅक्स चौकाकडून केएसबी चौकाकडे जात होती.

यानंतर तातडीने याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. कार पेटल्याने धुराचे लोट हवेत पसरले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बाहेरून बसवून घेतलेल्या सीएनजी किटमुळं आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशामन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Share This News

Related Post

स्वतःला बाळ होईना मंदिरातून पळवले अवघ्या सहा वर्षाच्या मुलाला; 90 CCTV व्हिडिओ धुंडाळून असे सापडले आरोपी

Posted by - March 7, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरातून एक अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेला स्वतःला अपत्यप्राप्ती होत नव्हती. या कारणाने तिने एका सहा…

BIG NEWS : व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना कर्ज घोटाळा प्रकरणी मुंबईत CBI ने केली अटक

Posted by - December 26, 2022 0
आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी सोमवारी व्हिडिओकॉनचे संस्थापक आणि सीईओ वेणुगोपाल धूत यांना अटक केली.…
ISRO

Chandrayaan 3 : चांद्रयान 3 च्या लँडिंगपूर्वी ISRO ने शेअर केला ‘हा’ नवा व्हिडिओ

Posted by - August 22, 2023 0
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’नं जुलै महिन्यात चांद्रयान (Chandrayaan 3) अवकाशात पाठवलं आणि त्या क्षणापासून या चांद्रयानावरच (Chandrayaan 3) सर्वांच्या…
accident

Pune Accident: भरधाव टँकरची दुचाकीला जोरदार धडक; मुलीच्या डोळ्यांदेखत आईने सोडला जीव

Posted by - June 28, 2023 0
पुणे : पुणे -सोलापूर महामार्गावर आज सकाळी टँकरने दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे आईचा जागीच मृत्यू (Pune Accident) झाला तर मुलगी…

गुंतवणुकीवर परताव्याच्या आमिषाने दोन कोटी ची फसवणूक करणाऱ्याला अटक

Posted by - April 16, 2023 0
गुंतवणुकीवर परताव्याच्या आमिषाने 2 कोटी 93 लाख 66 हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी क्रिप्टोबिझ कंपनीच्या संचालक राहुल विजय राठोड (वय ३५,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *