Madandas Devi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन

561 0

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे सोमवारी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजल्यानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मदनदास देवी यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी पुण्यातील मोतीबाग या संघाच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. मोतीबागमध्ये अंत्यदर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सर कार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सह सरकार्यवाह सुरेश सोहनी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, हे पुण्यात दाखल झाले आहेत.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे प्रथमच पुण्यात येत आहेत. ते आज मुंबईहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुण्यात दाखल झाले असून त्यांनी पुणे विमानतळ येथून थेट पुण्याचे राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे मुख्यालय असणाऱ्या मोतीबाग येथे येऊन मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Share This News

Related Post

Thane News

Thane News : धक्कादायक! ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू

Posted by - August 13, 2023 0
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या (Thane News) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका रात्रीत 17…

पुलाच्या प्रलंबीत प्रश्नासाठी समस्त ‘मांजरी’करांच्या वतीने साखळी उपोषण

Posted by - March 23, 2023 0
पुणे : 5 वर्षांहून अधिक काळ मांजरी रेल्वे फाटक येथे मृत अवस्थेत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करून तातडीने हे काम…

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नीतीची आत्महत्या

Posted by - January 28, 2022 0
बंगळुरु- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नातं डॉ. सौंदर्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ सौंदर्या ही येडियुरप्पा…

Breaking News ! टाटा स्टील कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट, तीन कर्मचारी जखमी

Posted by - May 7, 2022 0
जमशेदपूर- झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टील कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर प्लांटमध्ये भीषण आग लागली. या आगीत दोन…

ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्या, खासदार गिरीश बापट यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

Posted by - May 29, 2022 0
पुणे- ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *