Chandrakant Patil

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

283 0

पुणे : पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते काम करत असतात. त्यामुळे कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करुन, त्यांना सुखी, समाधानी आयुष्य मिळवून देणे हे माझे कर्तव्य समजतो, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आमदार निधीतून कोथरुडकर मधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यात ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या फिरते पुस्तक वाचनालय उपक्रमाअंतर्गत ‘मृत्यूंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ दुसऱ्या फिरते पुस्तक वाचनालयाचे लोकार्पण नामदार पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला,शहर उपाध्यक्ष शाम देशपांडे,कोथरूड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे सर, श्री.पुजारी, सरचिटणीस गिरीश खत्री, प्रा. अनुराधा एडके, दीपक पवार, विठ्ठल बराटे, भाजपा महिला मोर्चा प्रभारी व कोथरूडच्या सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर, स्थानिक नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, बाळासाहेब टेमकर, रणजित हरपुडे यांच्या सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा सर्व कार्यकर्त्यांना आग्रह असतो की, तुम्ही ज्या समाजात राहता. त्या समाजातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी होईल, यासाठी प्रयत्न करावेत. माननीय मोदीजींचा हा संदेश कार्यकर्त्यांसाठी ध्येय मंत्र आहे. त्यामुळे कोथरुड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करुन त्यांना सुखी समाधानी आयुष्य मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न असतो. त्यासाठी विविध उपक्रम कोथरुड मतदारसंघात राबवित आहे.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, कोथरुडमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी मोफत फिरते पुस्तक वाचनालय सुरू केले. या उपक्रमाला कोथरुडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाची लोकप्रियता दिवसागणिक वाढत असून, त्याचे थांबे वाढविण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार आज कोथरुड मध्ये मृत्यूंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ दुसरे फिरते पुस्तक वाचनालय सुरू करत आहे. यामुळे कोथरुडकरांची अपेक्षा पूर्ण होईल. कोथरुडकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात

IND Vs AUS Women Cricket : टीम इंडियाने इतिहास रचला ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच जिंकला कसोटी सामना

Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का

Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या

WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन

Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल

Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Posted by - January 24, 2023 0
पुणे : माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची…

महापालिकेकडून १० जलतरण तलावाला टाळे, पुणेकरांची ऐन उन्हाळ्यात गैरसोय

Posted by - May 4, 2022 0
पुणे- कंत्राटदारांनी चुकीच्या पद्धतीने चालवण्यात आल्यामुळे पुण्यातील काही जलतरण तलाव महापालिकेकडून सील करण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना गैरसोयीचा…

डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांची निवड

Posted by - November 23, 2022 0
पुणे : माजी नगरसेवक, भाजपा प्रवक्ते आणि उपाध्यक्ष धनंजय विष्णू जाधव यांची डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड…

उद मांजराला मिळाला नैसर्गिक अधिवास ; मुळशी वन विभागाकडून संरक्षण

Posted by - October 3, 2022 0
पुणे : हिंजेवाडी फेस टू मध्ये एमबीसी कॉर्ड्रेन कंपनी परिसरातील मागील काही दिवसांपासून दुर्मिळ प्रजातीचे उदमांजर आढळून येत होते. कंपनीच्या…

‘मराठी माथाडी कामगारांवर अन्याय जर होत असेल तर याद राखा..!’ निलेश माझिरे यांचा अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल इशारा

Posted by - November 9, 2022 0
पुणे : माथाडी कामगारांचे तीन वर्षापासून एका गोडाऊनने पेमेंट थांबवले आहे. माथाडी बोर्डाला वारंवार पत्रव्यवहार करून पण उत्तर मिळाले नाही.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *