Pune Car Accident

Pune Car Accident : पुण्यातून कोकणात जाताना कारचा अपघात; तरुणीसह तिघांचा धरणात बुडून मृत्यू

955 0

पुणे : पुण्यातील (Pune Car Accident) नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कार कोसळून एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे. या अपघातात मृत पावलेले सगळेजण पुण्यातील आहेत.

काय घडले नेमके?
पुण्यातील रावेत येथून चार जण फिरण्यासाठी निघाले होते. तेव्हा भोर तालुक्यातील निरादेवघर धरण मार्गाने महाडकडे जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. धुके आणि पाऊस असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने वळणावर गाडी 200 फूट उंचीवरून धरणाच्या पाण्यात पडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर एकजण थोडक्यात बचावला आहे.

संकेत जोशी (वय 26, रा. बाणेर) असे या अपघातातून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय रमेश धाडे, स्वप्निल शिंदे आणि हरप्रीत या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोईराज जल आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने पोलिसांनी दोन मृतदेह बाहेर काढले आहेत तर अजून एकाचा शोध सुरु आहे.

Share This News

Related Post

दसरा मेळावा : शिंदे गटाच्या पोस्टर नंतर आता टीझर देखील रिलीज ; दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी वापरला बाळासाहेबांचा आवाज

Posted by - September 29, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यावरुन जोरदार टोलवाटोलवी केली जाते आहे.…

पाककलेचा समृद्ध वारसा संक्रमित करण्याची गरज – शेफ विष्णू मनोहर

Posted by - February 27, 2022 0
भारतीय पाककलेचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित करण्याची गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले. पाककलेमध्ये निपुण…

महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा पालखी मार्ग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी , पहा फोटो

Posted by - March 11, 2023 0
महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन…
Accident News

Accident News: बहिणीकडून परतत असताना काळाचा घाला; रक्षाबंधन अगोदर भावाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 26, 2023 0
वाशीम : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यात दररोज अपघाताच्या (Accident News) अनेक घटना समोर येत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *