#PUNE CRIME : पुण्यात भर दिवसा सोन्याच्या दुकानात चोरी, चोरट्याची हातचलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

925 0

पुणे : पुण्यात भरदिवसा हातचलाखी करत एका ज्वेलरला तब्बल 5 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या चोरट्याचा सगळा कारनामा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 69 ग्रॅमचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरट्याच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे खडक पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

पुण्यातील भवानी पेठ परिसरात असणाऱ्या एका ज्वेलरच्या दुकानात दुपारच्या सुमारास एक इसम ग्राहक बनून आला. या इसमाने आधी त्या दुकानात 1 ग्रॅम सोने खरेदी केले. त्यानंतर त्याने दुकानदाराला आणखी काही दागिने दाखवायला सांगितले. दुकानदाराने त्याला जवळपास 69 ग्रॅम दागिने दाखवले. हा इसम दागिने बघता बघता बाहेर गेला. छोटी छोटी दगड आपल्या खिशात टाकून आत आणले. दुकानदाराचे लक्ष नसताना ते छोटे दगड दागिन्यांच्या पाकिटात ठेवले आणि दागिने बघत बघत हळूच त्याने ते दागिने खिशात ठेवले.

दुकानदाराचे त्या इसमाच्या हालचालींकडे लक्ष नव्हते. काही वेळात हा चोरटा फोनवर बोलण्याचे नाटक करत दुकानदारासमोर बसून राहिला आणि 5 मिनिटात फोनवर बोलत असल्याचे भासवत दुकानातून निघून गेला. बराच वेळ झाला तरी हा इसम दुकानात परत आला नाही. त्यानंतर दुकानदाराला चोरी झाल्याचं लक्षात आलं.

आपल्या दुकानात चोरी झाल्याचं लक्षात येताच दुकानदाराने खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दुकानदाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्याचा शोध सुरु आहे.

Share This News

Related Post

Crime

मित्रांवर प्रभाव टाकण्यासाठी खडकवासला धरण क्षेत्रात केली बंदुकीनं फायरिंग; तीन तरुणांवर गुन्हा दाखल

Posted by - April 18, 2023 0
मित्रांवर प्रभाव टाकण्यासाठी खडकवासला धरण क्षेत्रात बंदुकीनं फायरिंग करणं तीन तरुणाच्या चांगलंच अंगलट असून याप्रकरणी तीन तरुणावर हवेली पोलीस ठाण्यात…
ED

Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना सीबीआयकडून अटक

Posted by - June 28, 2023 0
मुंबई : वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत (Sachin Sawant) यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक…

पुणेकरांनो ! गुरुवारी ‘या’ भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

Posted by - October 11, 2022 0
पुणे : पुणे शहराच्या काही भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. पाणीपुरवठा बंद असणारे भाग ; …

PUNE : केंद्र सरकारच्या 5% GST संदर्भात घेतलेल्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेने पुकारलेला बंद यशस्वी

Posted by - July 25, 2022 0
पुणे : पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या अंतर्गत व्यापारी वर्गाने पुकारलेला बंद यशस्वी रीत्या शांततेत शांततेत पार पडला. कोणताही अनुचित…

110 कोटी रुपयांच्या बनावट कर क्रेडिट प्रकरणात महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून अटकेची कारवाई

Posted by - November 17, 2022 0
पुणे : महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात विशेष तपास मोहिमेंतर्गत रामनारायण वरूमल अग्रवाल या व्यक्तीला ६३०…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *