स्वारगेट-महाबळेश्वर एसटी बसमध्ये बंदुकीची गोळी सापडल्याने खळबळ

338 0

पाचगणी – स्वारगेट- महाबळेश्वर एसटी बस पाचगणीमध्ये आल्यानंतर आज, गुरुवारी सकाळी एसटीमध्ये चक्क बंदुकीची गोळी आढळून आली. पोलिसांनी ही गोळी ताब्यात घेऊन तातडीने तपास सुरू केला आहे.

पुण्याहून महाबळेश्वरला येणारी एसटी (एमएच १४ बीटी १२२६) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाचगणी बसस्थानकात आली. यावेळी गाडीतील प्रवाशांना ही बंदुकीची गोळी दिसली. प्रवाशांनी वाहक धोत्रे यांच्या निदर्शनास ही गोळी आणून दिली. तोपर्यंत या घटनेची माहिती पाचगणी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनीही तातडीने बसस्थानकात धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून गोळी ताब्यात घेतली.

एसटीमधून किती प्रवासी आले होते. त्या सीटवर कोण बसले होते, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. एखाद्या गुन्हेगाराच्या बॅगमधून चुकून गोळी खाली पडली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. पुण्याहून आलेल्या प्रवाशाकडेच पिस्तूल असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाचगणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश पवार हे अधिक तपास करीत आहेत.

Share This News

Related Post

संजय राऊत वैफल्यग्रस्त व्यक्ती ; त्यांना काही काम धंदे नाहीत – देवेंद्र फडणवीस

Posted by - April 17, 2022 0
रामनवमीपासूनदेशातील अनेक भागात जातीय हिंसाचार झाल्याच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारावरुन विरोधक भाजपवर टीका करत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत…
sharad pawar and ajit pawar

Ajit Pawar : शरद पवार अजित पवारांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली; भेटीत नेमकं काय घडलं?

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील…
Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट

Posted by - February 9, 2024 0
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Firing) यांच्यावर काल रात्रीच्या सुमारास फेसबूक लाईव्ह सुरु असताना…

नवीन गॅस कनेक्शन महागले ! नवीन कनेक्शनसाठी आता ग्राहकांना मोजावे लागणार एवढे पैसे

Posted by - June 15, 2022 0
मुंबई – पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते.…

युक्रेनमध्ये अडकलेल्या पुणे जिल्ह्यातील नागरिकांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन

Posted by - February 25, 2022 0
पुणे- युक्रेनमध्ये १८ हजारहून अधिक भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या आणि नोकरीसाठी तिथं वास्तव्यास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *