Eknath Khadse

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना मुंबई हायकोर्टाचा दणका ! भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ‘ती’ याचिका फेटाळली

636 0

मुंबई : पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हायकोर्टाने दणका दिला आहे. पुण्यातील भोसरी येथील या भूखंड घोटाळा प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाने खडसे यांची याचिका फेटाळली आहे. या याचिकेत एसीबीने दाखल केलेला गुन्हा रद्द करा, अशी मागणी करण्यात आली होती.

पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात ACB नं गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात कारवाई न करण्याचा दिलासा हायकोर्टाने यापूर्वी दिला होता.एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी यावर आक्षेप घेण्यात आले आहे. यादरम्यान ACB नं दाखल केलेला गुन्हा रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका एकनाथ खडसे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. मात्र, खडसे यांची ही याचिका हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. यामुळे आता खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काय आहे भोसरी भूखंड घोटाळा?
भोसरीतील एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणात आरोप असा होता की, एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक जमीन खरेदी केली होती. 3.75 कोटी रूपयांना ही जमीन खरेदी केली होती. या व्यवहाराची नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात रीतसर करण्यात आली. मात्र या जमीनीचा मूळ बाजारभाव 31 कोटी रूपये असताना गिरीश यांनी तो फक्त तीन कोटी रूपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा असल्याने तो इतका कमी किमतीत कसा काय विकत घेतला. यांसह अनेक मुद्यावरून ईडीने तपास सुरू केला.

Share This News

Related Post

shinde and uddhav

बाकी चुकलं पण सरकार वाचलं !

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल दिला. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड,…

#Digital Media : पुण्यातील डिजिटल मीडियाला कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक वार्तांकनासाठी पासेस नाकारले; डिजिटल मीडियामध्ये नाराजी

Posted by - February 8, 2023 0
पुणे : सध्या पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच मीडिया प्रतिनिधी या निवडणुकीची प्रत्येक अपडेट…

 अजरामर गाण्यांमुळे लतादीदी सदैव आपल्यासोबत असतील

Posted by - February 6, 2022 0
संपूर्ण जगाला आपल्या आवाजाने अनेक दशके मंत्रमुग्ध करणाऱ्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली…
Uddhav Nana and sharad pawar

ठाकरे गट आणखी दोन पाऊलं मागं? राऊतांनी सांगितले जागा वाटपाचे नवे सूत्र

Posted by - May 31, 2023 0
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे. मात्र या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता…

हडपसर ते वीर गाव पीएमपीएमएलच्या नवीन बसमार्गाचे उदघाटन

Posted by - February 2, 2022 0
पुणे- हडपसर ते वीर गाव दरम्यान पीएमपीएमएलच्या नवीन बसमार्गाचे उदघाटन मंगळवारी (दि. १) करण्यात आले. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मुख्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *