Lalit Patil Drug Case

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! ससून रुग्णालयातील ‘तो’ कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

340 0

पुणे : ललित पाटील प्रकरणात (Lalit Patil Drug Case) रोज नवनवीन अपडेट पाहायला मिळत आहे. आता या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. ललित पाटील हा रुग्णालयात उपचार घेत असतांना हा कर्मचारी त्याला सगळी मदत करत होता. तसेच तो सतत ललित पाटीलच्या संपर्कात होता. महेंद्र शेवते असे या अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो शस्त्रक्रिया विभागात कार्यरत होता.

ससुन रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात शिपाई म्हणून काम करणारा महेंद्र शेवते हा ड्रग माफिया ललित पाटीलच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. शेवते हा जरी शिपाई म्हणून नियुक्त असला तरी, 16 नंबर वॉर्ड मधील कैदी आणि ससुनमधील वरिष्ठ अधिकारी यांच्यामधे तो दुवा म्हणून काम करत होता.

16 नंबर वॉर्डमधे तो सतत ये जा करत होता. 16 नंबर वॉर्डमधे काम करणाऱ्या 10 ते 12 नर्सेसकडे चौकशी केल्यानंतर महेंद्र शेवतेला पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शेवतेची चौकशी केल्यानंतर तो कोणाच्या सांगण्यावरून ललित पाटील आणि इतर कैद्यांना मदत करत होता हे समोर येईल. त्यामुळे या प्रकरणात अजून काही गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : राजू शेतात जाऊन येतो; म्हणत घरातून गेला मात्र माघारी परतलाच नाही

Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल

Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी ठाकरेंचा मास्टर प्लॅन रेडी; भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी ‘हे’ 10 शिलेदार तयार

Accident News : कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Filmfare OTT Awards 2023 : ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023’ जाहीर

Share This News

Related Post

Pune News

Pune News : रक्तबंबाळ होईपर्यंत शेतकऱ्याला मारहाण; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा

Posted by - June 22, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune News) तुफान हाणामारी झाली…

चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

Posted by - March 1, 2023 0
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षकांना…

पुण्यात १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, शाळेच्या बाथरूममध्ये केले घृणास्पद कृत्य

Posted by - March 24, 2022 0
पुणे- पुण्यात एका १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळख असल्याचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने…

#PUNE : ससूनच्या समाजसेवा अधिक्षक विभाग प्रमुखपदी डॉ. शंकर मुगावे यांची नियुक्ती

Posted by - February 28, 2023 0
पुणे : ससून सर्वो पचार रूग्णालय पुणे येथील समाजसेवा अधिक्षक विभागाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. शंकर मुगावे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात…

जावेद अख्तर देणार ‘पिफ २०२२’ मध्ये विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान

Posted by - February 27, 2022 0
ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान देणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *