मोठी बातमी ! पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

375 0

पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो प्रकल्पास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हा प्रकल्प एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यामध्ये महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज ही टप्पा-1 ची विस्तारीत मार्गिका भुयारी पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 3 हजार 668 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-2ए) या 5.464 कि.मी. लांबीच्या मार्गावर 3 स्थानके असतील. पुणे शहरातील स्वारगेट व कात्रज प्रमुख उपनगरे असून त्यादरम्यान गुलटेकडी, पद्मावती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, साईबाबानगर, आंबेगाव अशी महत्वाची ठिकाणे आहेत. या परिसरातील वांरवार होणारी वाहतुकीची कोंडी टळून रस्त्यावरील दुर्घटना, प्रदूषण, इंधन खर्च, प्रवास कालावधी यामध्ये बचत होणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायक प्रवासासाठी स्वारगेट ते कात्रज ही भूयारी मेट्रो रेल्वे मार्गिका उपयोगी ठरणार आहे.
प्रकल्पासाठी शासनाकडून अनुदान स्वरूपात 450 कोटी 95 लाख व केंद्र व राज्य शासनाचे कर,शुल्क यावरील खर्चासाठी बिनव्याजी दुय्यम कर्ज स्वरूपात 440 कोटी 32 लाख रुपये असा एकूण 891 कोटी 27 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

पुणे महानगरपालिकेकडून 655 कोटी 9 लाख रुपयांचे वित्तीय सहाय्य महामेट्रोला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 300 कोटी 63 लाख रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी विनंती करण्यात येणार आहे. द्विपक्षीय/बहुपक्षीय वित्तीय संस्थेमार्फत 1803 कोटी 79 लाख रुपयांचे अल्प व्याज दराचे कर्ज घेण्यास, या कर्जाचा कोणताही भार राज्य शासनावर येणार नाही या अटीवर, महामेट्रो यांना प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

नाशिक : शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने; वादविवादातून ‘त्या’ नगरसेवकाच्या मुलाचा थेट हवेत गोळीबार, वाचा सविस्तर

Posted by - January 20, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये गुरुवारी नगरसेवकाच्या मुलानं हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये झालेल्या वादंगातून हा…

पुणे-मुंबई-पुणे : प्रगती एक्स्प्रेस मार्गांवर २५ जुलैपासून धावणार

Posted by - July 20, 2022 0
मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी पुणे-मुंबई-पुणे मार्गावर पुन्हा एकदा प्रगती एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाकाळात प्रगती एक्स्प्रेस बंद…

‘जग्गु आणि जुलिएट’ची सगळीकडे हवा, चित्रपटाला जोरदार प्रतिसाद – ‘पुनित बालन स्टुडिओज्’ची निर्मिती

Posted by - February 14, 2023 0
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत फक्त ‘जग्गु आणि जुलिएट’चीच चर्चा ऐकू येत आहे. १० फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या अतिशय पसंतीस…

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर; वसंत मोरेंची घेतली भेट

Posted by - December 9, 2022 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये आज अमित ठाकरे यांनी वसंत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *