मोठी बातमी : माजी खासदार संजय काकडे यांना उच्च न्यायालयाचा दणका; घरावर जप्ती, वाचा सविस्तर प्रकरण

1074 0

पुणे : भाजप उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर झालेल्या सुनावनीत काकडे यांच्या शिवाजीनगर येथील भाबुर्डा येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतील 7 हजार 440 चौरस फुट प्लॉटचा प्रत्यक्ष ताबा तर यशवंत घाडगे नगर येथील संजय काकडे बंगल्याचा प्रतिकात्मक ताबा घेण्याचे आदेश दिले आहेत. हा ताबा घेताना पोलिसांनी मदत पुरवावी असेही आदेशात म्हटले आहे.

मालमत्ता जप्ती संदर्भाने माजी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती आर. आय. छागला यांनी आदेश दिले आहेत.  काकडे यांनी विविध प्रॉपर्टी गहाण ठेवून कोट्यांवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान, कर्जाची परतफेड न केल्याने याबाबत कोर्ट रिसिव्हरने आदेशाची अमंलबजावणी केली आहे. याबाबतचा अहवाल सादर करावा. संबंधित बँकाशी मालमत्ता विक्रीबाबत सल्लामसलत देखील करण्याचे आदेशात नमूद केले. याप्रकरणात विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड यांनी माजी खासदार संजय काकडे यांच्यासह इतरांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने हे आदेश पारीत केले आहे.

24 ऑगस्ट 2018 रोजी कोर्ट रिसिव्हरची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना जप्ती आणून ती शिवाजी हाउसिंग सोसायटी (7440 चौरस फुट) (सर्व्हे न. 103, प्लॉट नंबर 62, एसबी रोड, भांबुर्डा, शिवाजीनगर) आणि संजय काकडे बंगला (29450 चौरस फुट) (यशवंत घाडगे नगर, एबीएल हाउसच्या मागे, विद्यापीठ रोड, शिवाजीनगर, पुणे) पॉपर्टी विकण्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच लॉ कॉलेज रस्त्त्यावरील अशोक पाथ लेन मधील काकडे पॅराडाईज या मालमत्तेवर देखील कोर्टाने जप्तीचे आदेश दिले असल्याचे अ‍ॅड. गौरव जोशी यांनी उच्च न्यायालयात नमूद केले. शिवाजी हाउसिंग पॉपर्टी, संजय काकडे बंगलो आणि एबीएल हाउसच्या मागील स्थावर मालमत्ता या तिन्ही मालमत्ता लोक मंगल को ऑपरेटिव्ह बँक, इंडिया बुल हाउसिंग फायनान्स तसेच समता नागरी को-ऑपरेटिव्ह बँकेला मॉरगेज केल्याचे त्यांनी उच्च न्यायालयात सांगितले.

दरम्यान, यापूर्वीच कोर्ट रिसिव्हरला शिवाजी हाउसिंग सोसायटी आणि संजय काकडे बंगलो त्याचबरोबर एसबीएल हाउसच्या मागील मालमत्तेचा ताबा घेण्याबाबत आदेश दिल्याचेही अ‍ॅड. जोशी यांनी युक्तिवाद करताना संबंधित आदेशाची अमंलबजावणी करण्याचे आदेश कोर्ट रिसिव्हरला देण्याची मागणी यावेळी केली. त्यावर प्रतिवादीच्या वकिलांनी संजय काकडे बंगलोवर जप्ती आणण्याबाबत आक्षेप नोंदविताना ही ते राहत असलेली मालमत्ता आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यात सादर करतो असे सांगितले. त्यावर न्यायालयाने वरील मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहेत.

तक्रारदार कंपनीच्या वतीने अ‍ॅड. गौरव जोशी, जतीन पोरे, अंकीता आगरवाल, तसेच कोर्ट रिसीव्हरच्या वतीने रेखा राणे, सरकारी वकील ज्योती चव्हाण तसेच प्रतिवादींच्या वतीने अ‍ॅड. अंकींता सिंघानीया काम पाहत आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 27 मार्च रोजी होणार असून, पुढील तारखेला प्रतिवादींनी हजर रहावे असेही उच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.

Share This News

Related Post

Police Transfer

पुण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Posted by - June 17, 2023 0
पुणे : महाराष्ट्र राज्य गृह विभागाने राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. यामध्ये काही निरीक्षकांच्या बदल्या विनंतीवरून तर…

चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्याला प्राधान्य – उद्योगमंत्री उदय सामंत

Posted by - October 19, 2022 0
पुणे : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत कोर्टयार्ड मेरियेट येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चाकण…
Satara News

Satara News : सिग्नल तोडणे बेतले जीवावर; भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर

Posted by - July 6, 2023 0
सातारा : राज्यात काही महिन्यांपासून अपघाताचे (Satara News) प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये सरकारकडून अनेकवेळा लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Posted by - January 3, 2023 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन…
latur Doctor

अरे बापरे! चक्क सुरक्षा रक्षकाने रुग्णाला दिले इंजेक्शन; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Posted by - June 17, 2023 0
लातूर : रुग्णालयांमध्ये अनेकदा हलगर्जीपणामुळे काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. वेळेत उपचार न मिळाल्याने किंवा चुकीच्या उपचारांमुळे रुग्ण दगावल्याच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *