Pune PMC Water Supply News

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

175 0

पुणे : उन्हाचा तडाखा वाढत असताना आता पुणेकरांसाठी (Pune News) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. येत्या शुक्रवारी 24 मे रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे लोकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. देखभाल दुरुस्ती तसंच विद्युत विषयक कामांमुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी उशिरा तसंच कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. मात्र पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी शनिवारी संध्याकाळची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याच आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे शहराच्या मध्यवती भागातील पेठासह गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत भागेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहननगर, सुस रोड, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, चतुः श्रृंगी टाकी परीसर पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर, जुने वारजे जलकेंद्र भाग, लष्कर जलकेंद्र भाग, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत येणाऱ्या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Share This News

Related Post

election-voting

Pune News : पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये देशातील पहिले मतदार केंद्र; पुणे प्रशासनाचा अनोखा उपक्रम

Posted by - April 16, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने यंदा पहिल्यांदाच विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये म्हणजेच सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्याचा निर्णय…

Sasoon Hospital : ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली; 6 जणांना बाहेर काढण्यात यश

Posted by - November 3, 2023 0
पुणे : दिनांक 3\11\2023 रोजी दुपारी 11 वाजून 50 मिनिटे यावेळी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात ससून रुग्णालय (नवीन इमारत) येथे…

दुर्दैवी! पुण्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

Posted by - May 8, 2022 0
पुण्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या शिरगाव पोलीस चौकीमध्ये कार्यरत असणारे पोलीस नाईक दिलीप बोरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने  निधन झालं  ते…

ऐन सणासुदीत पुणेकर वाहतूक कोंडीने हैराण ; पुन्हा होणार स्फोट, फुटणार खडक, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू !

Posted by - October 4, 2022 0
पुणे : 2 ऑक्टोबरला चांदणी चौकातील फुल पाडण्यात आला. त्यानंतर आता पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा असतानाच सोमवारी…

पुण्यात भाजप कार्यालयासमोर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने (व्हिडिओ)

Posted by - February 10, 2022 0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या वक्तव्यावरून देशभरात राजकारण पेटले आहे. महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना पसरविला असा आरोप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *