Sharad Pawar

राष्ट्रवादीला मोठा धक्का! पवारांच्या ‘हा’ खास शिलेदार करणार भाजपात प्रवेश

803 0

पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाने एक वेगळे वळण घेतले आहे. अशातच आता काही दिवसांवर निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अशोक टेकवडे (Ashok Tekwade) उद्या (मंगळवारी) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षात प्रवेश करणार आहेत. अशोक टेकवडे हे 2004 ते 2009 दरम्यान पुरंदर हवेलीचे आमदार राहिले आहेत. बारामती काबीज करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने या हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अशोक टेकवडे गेल्या महिन्यांपासून राष्ट्रवादीत (NCP) नाराज होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत फार काळ राहणार नाही अशी पुरंदरमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती.अखेर या नाराजीतूनच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची पुरंदरमध्ये (Purandar) ताकद वाढण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की.

Share This News

Related Post

#URFI : उर्फी जावेदचा फॅशन सेन्स पाहून चहाते म्हणाले; अरे देवा ! फक्त दोऱ्यांवर टिकवला ड्रेस… PHOTO

Posted by - February 20, 2023 0
मुंबई : उर्फी जावेद ही एक मॉडेल आहे. दिसायला सुंदर आणि कमनीय बांधा असलेली ही मॉडेल तिच्या कामापेक्षा विचित्र फॅशन…

पीयूसी केंद्रांचे नूतनीकरण ठप्प ! पीयूसी केंद्रचालकांनाच माराव्या लागत आहेत आरटीओत फेऱ्या !

Posted by - January 19, 2023 0
शहरातील प्रदूषण चाचणी केंद्राचा म्हणजे पीयूसी परवाना नूतनीकरणास तांत्रिक अडचणी येत असल्यानं ‘पीयूसी’ केंद्र चालकांना ‘आरटीओ’त फेऱ्या माराव्या लागत आहेत.…
Hasan Mushrif

Ajit Pawar : उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर मुश्रीफांचा पलटवार

Posted by - November 12, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं.…
Pune News

Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

Posted by - April 28, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *