बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार, तरुण थोडक्यात बचावला (व्हिडिओ)

747 0

पुणे- किरकोळ वादातून दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने राडा घालून तरुणावर गोळीबार केला. वेळीच पळ काढल्यामुळे संबंधित तरुण थोडक्यात बचावला. ही घटना सोमवारी मध्यरात्री बिबवेवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित थोपटे ( वय ३२ रा. शिवशंकर सोसायटी गल्ली क्रमांक दोन, बिबवेवाडी ) याचे दत्तवाडी परिसरात सलूनचे दुकान आहे. चार फेब्रुवारी रोजी त्याचा आरोपींशी वाद झाला होता. या वादातून सोमवारी मध्यरात्री दहा ते अकरा जणांचे टोळके शिवशंकर सोसायटी परिसरात आले. हातात कोयते आणि काठ्या घेऊन आलेल्या या टोळक्याने परिसरात दहशत माजविली. त्यावेळी फिर्यादी अमित थोपटे हा घराखाली आपल्या मित्रांसमवेत थांबलेला असताना या टोळक्यातील एकाने पिस्तूल काढले आणि थोपटे याच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने वेळीच पळ काढल्यामुळे तो थोडक्यात बचावला.

गोळीबाराच्या आवाजाने शांत झालेला परिसर हादरून गेला आणि एकच गोंधळ उडाला . त्यानंतर हे टोळके दहशत माजवत परिसरातून पसार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नासह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Pan Card Money

PAN Card संबंधित ‘ही’ एक चूक तुम्हाला पडू शकते 10 हजार रुपयांना; जाणून घ्या त्याबद्दल

Posted by - June 22, 2023 0
पॅन किंवा परमानेंट अकाउंट नंबर हा 10 अंकी अल्फान्यूमेरिक आयडी (PAN Card) आहे. जो भारतीयांसाठी एक महत्त्वाचे कायदेशीर ओळखपत्र आहे.…

पुणे : ताम्हिणी घाटात पर्यटकांची कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू ; अन्य तिघांना वाचवण्यात यश… पाहा VIDEO

Posted by - August 21, 2022 0
पुणे : पुण्यातील ताम्हिणी घाटात पर्यटकांची कार दरीत कोसळून तिघांचा मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या कारमध्ये एकूण सहा तरुण…
Navi Mumbai News

Navi Mumbai News : घातपात की आत्महत्या ! घर सोडून गेलेल्या ‘त्या’ तरुणीचा 7 दिवसांनी आढळला मृतदेह

Posted by - September 1, 2023 0
नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील (Navi Mumbai News) कासारभाट गावातील प्रियांका तांडेल या 20 वर्षीय तरुणीला मोबाईल जास्त वापरते म्हणून…

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; समाज कल्याण आयुक्तांनी केली पाहणी

Posted by - December 31, 2022 0
पुणे : पेरणे (ता. हवेली) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *