पुणे जिल्ह्यातील भुकुम गावाची धुरा भाऊ-बहिणीच्या खांद्यावर

3377 0

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला आहे. मुळशीतील भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाचा कारभार आता बहीण-भाऊ पाहणार आहे. त्यामुळे या योगायोगाची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे.

भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुरी आमले यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मयुरी आमले यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांबळे यांनी मयुरी अभिलाष आमले यांना सरपंच म्हणून घोषित केले. निर्वाचित सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची मिरवणूक भुकूम गावठाण ते आंग्रेवाडी पर्यंत काढण्यात आली. भूकूम गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सख्खे मावस बहीण आणि भाऊ सरपंच आणि उपसरपंचपदी विराजमान झाले असल्यामुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. उपसरपंच पदी अंकुश खाटपे यांची अगोदरच निवड झाली होती.

Share This News

Related Post

Vasant More

Vasant More : वसंत मोरे यांच्या विविध नेत्यांसोबतच्या भेटीत नेमकं होतं तरी काय ? TOP NEWS ची INSIDE STORY

Posted by - March 29, 2024 0
पुणे : मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी विविध पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठींचा धडाका लावलाय… वसंत मोरे यांनी कायमच भाजपला…

कोंढव्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण; दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत एनआयएने केली जप्त

Posted by - March 17, 2024 0
कोंढव्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण; दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत एनआयएने केली जप्त गेल्या काही दिवसात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुणे शहर…

खळबळजनक : पुणे शहरात विक्षिप्त अघोरी कृत्य; मूलबाळ व्हावे म्हणून डोक्यावर बंदूक ठेवून खायला लावले घुबडाचे पाय आणि स्मशानभूमीतून आणलेल्या मृतांची राख

Posted by - January 19, 2023 0
पुणे : पुण्यातून अत्यंत खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी या स्वतः बी इ कॉम्प्युटर झालेले आहेत. 2019 मध्ये…

मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाची मर्यादा पाळली जाईल, पुण्यात मुस्लिम संघटनेचा निर्णय

Posted by - April 21, 2022 0
पुणे- मशिदीवरील भोंग्यांना परवानगी असेल तर ते काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र आवाजाची मर्यादा पाळली जाईल अशी भूमिका पुण्यातील मुस्लिम…

महाविकास आघाडीचा महामोर्चा; संजय राऊत सुप्रिया सुळे मोर्चास्थळी दाखल

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत विराट महामोर्चाच आयोजन करण्यात आलं असून या महामोर्चात समविचारी पक्ष, महाराष्ट्र प्रेमी महापुरुषांना माणणारे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *