नितीन गडकरी यांच्या हस्ते भांडारकर संस्थेतील “समवसरण” ॲम्फी थिएटरचे उद्घाटन

446 0

पुणे- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या “समवसरण” या ॲम्फी थिएटरचे उद्घाटन गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी खासदार प्रदीप रावत, कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, विश्वस्त राहुल सोलापूरकर, संजय पवार, सदानंद फडके व सुधीर वैशंपायन उपस्थित होते.

यावेळी गडकरी म्हणाले की, भारतीय संस्कृतीला जोडणारे अनेक धागे आहेत. उपासना पद्धती वेगळी असली तरी भक्ती एकच आहे, त्यामुळे विविधता असूनही आपण एक आहोत. आपण गरीब असलो तरी आपली कुटुंब व्यवस्था मूल्याधिष्ठित आहे. आपल्या धर्म, जातींमध्ये निष्कारण गैरसमज आहेत, ते दूर व्हायला हवेत. आपण त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. चांगली कामे होत आहेत, त्यासाठी लोकाश्रय मिळायला हवा.

यावेळी फिरोदिया यांनी, अशा प्रकारच्या ॲम्फी थिएटरच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी आणि उद्देश याबद्दल माहिती दिली. या अ‍ॅम्फी थिएटरला ‘समवसरण’ दिलेल्या नावाबद्दल त्यांनी सांगितले की, साम म्हणजे समान आणि अवसर म्हणजे संधी, म्हणजेच समान संधी. सर्वांना जोडणारी भारतीय संस्कृती आहे. त्यातील मूल्यांकडे आपण पाहिले पाहिजे. आपल्या परंपरा आणि जीवन पद्धती यांचा विसर पडलाय, त्या आता पुन्हा सुरू करण्याची गरज आहे, असे फिरोदिया म्हणाले.

Share This News

Related Post

राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - August 26, 2022 0
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

मशिदीवरील भोंगे खाली उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार !

Posted by - May 4, 2022 0
मुंबई- आमचे हे एक दिवसाचे आंदोलन नसून मशिदीवरील भोंगे खाली उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा मनसे…

राज्यभरातील जिल्हा वार्षिक आराखड्यांना स्थगिती; शिवतारेंच्या मागणीनंतर सरकारकडून तातडीने परिपत्रक 

Posted by - July 4, 2022 0
पुणे जिल्ह्यात मागील पालकमंत्र्यांनी सरकार कोसळण्याच्या आधी घाईघाईत मंजूर केलेल्या जिल्हा वार्षिक आराखड्यामध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांवर निधीची खैरात करून शिवसेना, काँग्रेस…

घरगुती गॅस पुन्हा महागला, एलपीजी सिलेंडर आता मिळणार ‘या’ किमतीला

Posted by - May 19, 2022 0
नवी दिल्ली- महागाईने देशात उच्चांक गाठला असून त्यामध्ये आता घरगुती गॅसच्या दरवाढीने भर पडली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडर 3 रुपये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *