Sushma Andhare And Rupali Chakankar

Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लूडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाल्या…

326 0

पुणे : बारामती लोकसभा निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीच्या निश्चित मानलेल्या सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. लग्न करून दिल्यानंतर मुलीने माहेरी लूडबूड करू नये, अशा शब्दात चाकणकरांनी सुळेंवर टीका केली. चाकणकरांनी केलेल्या या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या चाकणकरांनी एका महिलेच्या अधिकारावर केलेले विधान अत्यंत चिंताजनक असल्याचे अंधारेंनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत आपण खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल तावाने बोललात. यात तुमचा स्वार्थ दिसून येतो. मात्र आपले, “लेकीने माहेरी लुडबुड करू नये” हे विधान महिला म्हणून तर अत्यंत निंदनीय आहे, परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून काम करणाऱ्या एका व्यक्तीने केलेले वक्तव्य म्हणून चिंतनीय आहे.

रूपालीजी महिला आयोग म्हणून आपण जेव्हा कधी अधिकार वापरले ते फक्त आणि फक्त स्वतःवर कधी समाजमाध्यमांमधून टीका टिप्पणी झाली तर त्यासाठी म्हणून ते वापरले गेले. पण इतर महिलांवर कधी जर अभद्र टिप्पण्या झाल्या तर आपण कधीही स्वतःहून त्याची दखल घेतली नाही. कारण अशा काळात जेव्हा एखादी महिला सैरभैर होते अडखळते.. अडते.. नडते.. तेव्हा तिच्या पाठीशी ठामपणे उभे असते ते तिचं कुटुंब. सासर आणि माहेर दोन्हीकडचे लोक.. असे म्हणत अंधारेंनी चाकणकरांना चिमटाही काढला.

कित्येक कुटुंबांमध्ये आपल्या वृद्ध माता-पित्यांची काळजी त्यांची अपत्ये घेतात. मात्र ज्यांना एकच अपत्य आहे आणि ती मुलगी असेल तर त्या वृद्ध माता-पित्यांची काळजी कुणी बरे घ्यायला हवी? असा प्रश्न उपस्थित करत अंधारेंनी चाकणकरांना चांगलेच सुनावले. त्या म्हणाल्या, सुळे या पवारांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. अशा स्थितीत आपल्या 84 वर्षे वयोवृद्ध पित्याला अनेक आजारांनी ग्रासलेले असताना त्यांना आधार कुणी दिला पाहिजे? रक्ताच्या नात्यातील लोकांनी केलेले वार झेलणाऱ्या आपल्या बापाला आधार देणारी लेक म्हणजे लुडबुड असे तुम्हाला वाटत असेल तर संवेदनशीलता हा शब्द तुम्हाला नव्याने शिकवण्याची गरज आहे.

तुमचा आणि अशा माणुसकीचा फार परिचय झालेला दिसत नाही. आपल्यात थोडी सहसंवेदना शिल्लक असेल आणि अमुक एका पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नाही तर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या पदाची गरिमा आणि राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वसा वारसा कळत असेल तर आपण आपले शब्द परत घ्याल, अशी अपेक्षा आहे, अशी अपेक्षाही अंधारेंनी व्यक्त केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : होळीसाठी गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : 6 वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वतःलादेखील संपवलं

Parvatasana : पर्वतासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Sant Tukaram

देहू ते पंढरपूर वारीमध्ये‘आनंदडोह – आनंदवारी’ संपन्न होणार!

Posted by - June 5, 2023 0
पुणे : देहूहून पंढरपूरला जाणाऱ्या वारी सोबत यंदा जगद्गुरू संत तुकारामांचे जीवन एकपात्री प्रयोगातून सादर करण्याचा अनोखा ‘आनंदडोह – आनंदवारी’…

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची कामे मार्गी लावण्याचे समाधान-डॉ.नीलम गोऱ्हे

Posted by - July 10, 2022 0
पुणे :श्री विठ्ठलाच्या कृपेने सर्व जनता सुखी राहो, रुक्मिणी मातेच्या कृपाशीर्वादाने सर्व माता भगिनिंचा समाधानाने प्रवास होवो. सर्व वारकऱ्यांच्या वारीचा…

Vanchit Bahujan Aaghadi : महाविकास आघाडीला मोठा धक्का ! वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

Posted by - March 27, 2024 0
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीबरोबर (Vanchit Bahujan Aaghadi) सातत्याने बैठकींचं…
Maharashtra Election

Loksabha Elections : कर्जत विधानसभा मतदारसंघात साहित्य वितरणासाठी ४७ टेबल

Posted by - May 12, 2024 0
मुंबई : कर्जत विधानसभा मतदारसंघातील ३३९ मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्याचे वितरण कर्जत येथील पोलिस ग्राउंड येथून करण्यात आले. यासाठी ४७…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *