पुरंदरे यांनी ऑक्सफर्ड प्रेसला पाठवलेले पत्र मनसेकडून सादर, शरद पवार माफी मागणार का ?

617 0

मुंबई- जेम्स लेन प्रकरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी मनसेने केली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ऑक्सफर्ड प्रेसला पाठवलेले निषेध पत्र मनसेकडून समोर आणण्यात आले आहे. त्यामध्ये बाबासाहेबांनी जेम्स लेनचे पुस्तक मागे घेण्याची मागणी केली आहे. आता या पत्रावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माफी मागणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

ऑक्सफर्ड प्रेसला लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख आहे की, जेम्स लेनने त्याच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दिलेली आक्षेपार्ह माहिती ही त्याची स्वतःची कुटील कल्पना आहे. हे वादग्रस्त पुस्तक प्रकाशनाने मागे घ्यावे. अन्यथा या पुस्तकावर भारत सरकारने बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे . विशेष म्हणजे या पत्रावर स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांच्या बरोबरच खासदार प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार, निनाद बेडेकर, सदाशिव शिवदे , वसंत मोरे आदी मान्यवरांच्या सह्या आहेत. खासदार प्रदीप रावत वगळता सगळे मान्यवर इतिहास तज्ज्ञ आहेत. एकूणच शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत, असा दावा मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?

जेम्स लेनचं गलिच्छ लिखाण हे बाबासाहेब पुरंदरेंच्याच माहितीवर आधारित होते. आपण जे लिखाण केलं, त्याची माहिती पुरंदरेंकडून घेतल्याचं लेन यांनी म्हटलं. जेम्स लेनने हे उघड सांगूनही पुरंदरे यांनी त्याचा खुलासा केला नाही. त्यामुळे मी पुरंदरेंवर टीका केली असेल, तर मला त्याचं दुःख नाही, तर अभिमान वाटतो. त्यामुळे यावर कुणी काय म्हटलं असेल, तर मला त्याबद्दल काही सुचवायचे नाही, असे म्हणत अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बुधवारी मुंबईत उत्तर दिले होते. परंतु आता हे पत्र समोर आल्यानंतर शरद पवार खरोखरीच माफी मागणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Share This News

Related Post

Karnataka Congress

Karnataka Congress : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे काँग्रेस सरकार कोसळणार; ‘या’ भाजप नेत्याचा मोठा दावा

Posted by - June 26, 2023 0
बेळगाव : कर्नाटकमधील काँग्रेस सरकार (Karnataka Congress) पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार…
Keshav

Pune News : संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट; भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

Posted by - April 24, 2024 0
पुणे : देशाची सामाजिक घडी पूर्णपणे मोडून केवळ अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे राजकारण करण्याचे घातक राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस हादरून…

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन

Posted by - August 1, 2022 0
पुणे : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त रा.स्व. संघाच्या वतीने पुणे महानगरात विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन…
Supriya Sule

Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या…

Posted by - March 22, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराला सुरुवात झाली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी…

पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात नसून हत्याच ! आरोपीची कबुली, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - February 15, 2023 0
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रात वादाची नवीन ठिणगी पडली आहे. दरम्यान संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाल्यामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *