काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अरविंद शिंदे यांची निवड

286 0

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी गटनेता अरविंद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची प्रभारी शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली असून पक्षाची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर ते शहराध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारतील.

काँग्रेसच्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरातील ठरावानुसार पाच वर्षांपासून जास्त काळ शहराध्यक्षपदावर कार्यरत असलेले शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे शहराध्यक्षपद रिक्त झाले होते.

शहराध्यक्षपदावर नियुक्ती होण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली होती. पक्षाची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सध्या प्रभारी शहराध्यक्ष म्हणून बागवे काम पहातील, अशी शक्यताही पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रदेश काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांच्या नावाची घोषणा मंगळवारी करण्यात आली.

अरविंद शिंदे हे पक्षाचे अनुभवी नगरसेवक आहेत. स्थायी समितीचे अध्यक्षपद, गटनेता यासह महापालिकेतील विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. काँग्रेसच्या शहराध्यपदासाठी ते आग्रही होते. यापूर्वीही त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यानुसार त्यांची निवड करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार आहे.

Share This News

Related Post

Murlidhar mohol

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Posted by - April 25, 2024 0
पुणे : सगळीकडे निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आज पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आपला उमेदवारी अर्ज…
Leopard Rescue Video

Leopard Rescue Video : विहिरीत पडले बिबट्याचे बछडे, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video आला समोर

Posted by - September 7, 2023 0
जुन्नर : आजकाल जंगली प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्राणी दिसून येतात. अनेकवेळा हे…

शिवसेनेचे बये दार उघड अभियान; शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविली जाणार मोहीम

Posted by - September 25, 2022 0
देशात आणि राज्यात आदिशक्तीचा जागर असलेला नवरात्रीचा उत्सव सुरू होत असून विजयादशमीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची ऐतिहासिक सभा ही…

मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी

Posted by - August 1, 2022 0
मुंबई: गोरेगाव येथील पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भातील एक मोठी बातमी समोर…
Vanchit Bahujan Aaghadi

Vanchit Bahujan Aaghadi : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वंचित बहुजन आघाडीचे पत्र! म्हणाले…

Posted by - September 1, 2023 0
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रदेश प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून अफवांचा बाजार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *