‘आपला महाराष्ट्र आपले सरकार…’ विभागीय प्रदर्शनाचे पुण्यात उद्या उद्घाटन

316 0

पुणे- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या विविध योजना आणि गेल्या दोन वर्षातील ठळक कामगिरीचे सचित्र दर्शन घडवणाऱ्या विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन १ मे रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय माहिती कार्यालयामार्फत या प्रदर्शनाचे १ मे ते ५ मे पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भव्य इमारतीच्या तळमजल्यावरील प्रांगणात आयोजित या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती मिळणार आहे.

प्रदर्शनात सचित्र मजकूराच्या माध्यमातून  कृषी, महसूल, आरोग्य, पर्यावरण, ग्रामविकास, उर्जा, अन्न व पुरवठा, कामगार कल्याण, सामाजिक न्याय, आदिवासी, जलसंधारण, शिक्षण, क्रीडा, उद्योग, मराठी भाषा, पाणीपुरवठा व स्वच्छता, वने, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, सहकार, पणन, गृहनिर्माण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, नगरविकास आदी विभागांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहितीदेखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. ३६० अंश सेल्फी पॉईंट हे या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

त्याचबरोबरच पुणे विभागात ५ जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, वैद्यकीय सुविधा, पयर्टन, तीर्थक्षेत्र विकास यांसह विविध विकास योजनांची व कामाची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनाचा प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दीपक कपूर हे वेळोवेळी आढावा घेत असून मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन विभागीय माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी केले आहे.

Share This News

Related Post

Rain Update : शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

Posted by - July 16, 2022 0
पुणे : शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाचा जोर ओसरला आहे. आज खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी…

शुभदा सहस्रबुद्धे यांचे पुण्यात शुक्रवारपासून ‘कार्त दे विझीत’ चित्र प्रदर्शन

Posted by - June 7, 2022 0
पुणे- चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांच्या ‘कार्त दे विझीत’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शुभदा सहस्रबुद्धे यांनी चारकोल…

पीएमश्री योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 23 शाळांची निवड

Posted by - April 3, 2023 0
पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया म्हणजे पीएमश्री योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 23 शाळांची निवड झाली आहे. येत्या काळात या शाळांचा आदर्श…
liquor

Pune Ganeshotsav 2023 : तळीरामांसाठी मोठी बातमी ! गणेशोत्सवामुळे ‘या’ दिवशी पुण्यात मद्यविक्री राहणार बंद

Posted by - September 14, 2023 0
पुणे : पुण्यात गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2023) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 19…

कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न डॉ. रजनी इंदुलकर यांची प्रमुख उपस्थिती

Posted by - February 27, 2023 0
पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटर, सिग्निया आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *