anna hazare and jitendra awhad

Anna Hazare : जेष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांची श्री. जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस

275 0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री श्री. जितेंद्र सतिश आव्हाड रा.ठाणे, मुंबई यांना जेष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांनी त्यांचे पुण्यातील कायदा सल्लागार ॲड.मिलिंद दत्तात्रय पवार यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. श्री. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर श्री.अण्णा हजारे यांचा फोटो ट्यूट करित “या माणसाने देशाचं वाटोळे केले, टोपी घातली म्हणजे कोणी गांधी होत नाही” अशा आशयाचे अण्णा हजारे यांची बदनामी करणारे ट्यूट केले होते.

श्री. जितेंद्र आव्हाड यांनी केलेले त्या ट्यूट मुळे अण्णा हजारे यांची काहीएक कारण नसताना बदनाम झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे ट्यूट सध्या चालू असलेल्या राजकीय कुरघोड्या व गढूळ राजकारणा मध्ये अण्णा हजारे यांना राजकारणात खेचणारे आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांना पुण्यातील त्यांचे कायदा सल्लागार ॲड. मिलिंद पवार यांच्या मार्फत अण्णा हजारे यांची नाहक व जाणीवपूर्वक बदनामी केली म्हणून कायदेशीर नोटीस बजावली आहे. संबंधित नोटीसची प्रत माहिती करिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते श्री.शरद पवार साहेब यांनाही पाठवली आहे.

श्री.अण्णा हजारे हे एक जेष्ठ समाजसेवक आहेत. अण्णा हजारे यांच्या अनेक आंदोलनांमुळे अनेक चांगले लोक उपयोगी कायदे देशाला मिळाले आहेत. श्री.अण्णा हजारे यांना मानणारा मोठा वर्ग देशात-विदेशात आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या सारख्या जबाबदार राजकीय व्यक्तीने असे चुकीचे बदनामीकारक वक्तव्य करणे हे अण्णा हजारे यांची बदनामी करणारे आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांची नाहक बदनामी झाली आहे. श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या वरील ट्यूट नंतर अण्णा हजारे तुमच्या वर कायदेशीर कारवाई करणार आहेत, असे काही पत्रकारांनी श्री. जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता, बरं झालं त्यामुळे तरी त्यांना जाग आली. असं उपहासात्मक उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित पत्रकारांना दिले. ते वक्तव्य देखील अनेक वॄत्त वाहिन्यांनी प्रसिद्ध केले आहे. यावरून श्री. जितेंद्र आव्हाड यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. असे त्यांच्या वक्तव्या वरून दिसून येते.

उपलब्ध माहितीनुसार श्री. जितेंद्र आव्हाड यांच्यावर 10/15 फौजदारी खटले दाखल आहेत. श्री. जितेंद्र आव्हाड यांना प्रतिष्ठीत लोकांची बदनामी करण्याची सवय आहे. श्री. जितेंद्र आव्हाड यांनी श्री.अण्णा हजारे यांच्या नावाची बदनामी करून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्याचा‌ वापर केला आहे. तेव्हा अशी बेजबाबदार व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय व्यक्तीवर कायदेशीर कारवाई गरजेचे वाटले म्हणून श्री.अण्णा हजारे यांनी श्री. जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस पाठवत असल्याचे ॲड. पवार यांनी पाठवलेला नोटीसी मध्ये म्हटले आहे.

ॲड. पवार यांनी पाठविलेल्या कायदेशीर नोटीसी नुसार श्री. जितेंद्र आव्हाड यांनी श्री. अण्णा हजारे यांची बिनशर्त लेखी माफी मागावी,अशी मागणी कायदेशीर नोटीसी द्वारे श्री.अण्णा हजारे यांनी केली आहे. माफी न मागित्यास श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मानहानी, बदनामी केल्या प्रकरणी श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात फौजदारी व दिवाणी स्वरूपाचे दावे खटले दाखल करण्यात येतील असे नमूद केले आहे. यापूर्वी देखील काँग्रेसचे प्रवक्ते श्री. मनीष तिवारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. नबाब मलीक यांना अण्णा हजारे यांनी ॲड. मिलिंद पवार यांच्या मार्फत अण्णा हजारे यांची नाहक बदनामी केली, अण्णा हजारे यांच्या विरोधात बेजबाबदार त्यांच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी खोटे व बदनामी कारक वक्तव्य, आरोप केले होते. तेव्हा देखील संबंधित नेत्यांना ॲड. पवार यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस पाठवल्या होत्या. परंतु वरील राजकीय नेत्यांनी तात्काळ अण्णा हजारे यांची जाहीर माफी मागितली होती. त्यामुळे संबंधित प्रकरणं किंवा वाद पुढे न्यायालयात गेला नव्हता.

Share This News

Related Post

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अरविंद शिंदे यांची निवड

Posted by - June 7, 2022 0
काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी गटनेता अरविंद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची…

मराठी विज्ञान परिषद संस्थापक म.ना.गोगटे यांचे निधन

Posted by - May 8, 2022 0
मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक म.ना.गोगटे यांचे पुणे येथे त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. ते म.ना.…

देशातील मोठ्या प्रदर्शनात सहभागाची पुणेकरांना संधी; ई-वाहनांची 30 किमीची रॅली

Posted by - March 21, 2022 0
सीएनजी, हायड्रोजन, जैवइंधन आदींवर चालणाऱ्या वाहनांचे राष्ट्रीय प्रदर्शन पुणेकरांना येत्या दोन ते पाच एप्रिल दरम्यान पाहायला मिळणार आहे. त्यात बहुराष्ट्रीय…

पुणे : मध्यराञी हॉटेल तिरुमला भवन येथे सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली

Posted by - October 11, 2022 0
पुणे : काल मध्यराञी १२•४६ वाजता (दिनांक ११•१०•२०२२ रोजी) हडपसर, साडेसतरा नळी, हॉटेल तिरुमला भवन फुड कॉर्नर येथे आग लागल्याची…
Pune News

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विद्यापीठ चौकात आजपासून होणार वाहतूक मार्गांत बदल

Posted by - November 10, 2023 0
पुणे : आचार्य आनंद ऋषी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मेट्रोसाठीच्या उड्डाणपुलाचे काम चौकात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *