सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील

265 0

पुणे: सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जागतिक ग्रंथ दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. श्री. पाटील यांनी वाचक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते, ग्रंथालयातील अधिकारी-कर्मचारी आणि ग्रंथप्रेमींना जागतिक ग्रंथ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गेल्या काही महिन्यात राज्यात वाचन संस्कृती वाढविण्याच्या अनुषंगाने विविध महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ, विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हा ग्रंथालय अधिकारी’ पदांची निर्मिती, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये बालकुमार ज्ञानकोपरा निर्मिती तसेच महत्त्वपूर्ण ग्रंथालयांना आधुनिकीकरणासाठी निधी आदी निर्णय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आहेत.

सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात ६० टक्के वाढ

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी ६० टक्के अनुदानवाढीचा तातडीने निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ राज्यातील १० हजार ९१८ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मिळाला आहे. वाढीव अनुदानासह मागील वर्षातील थकीत अनुदानाचे सुमारे ६० कोटी २० लाख रुपये या ग्रंथालयांना वितरीत करण्यात आले आहे.

 

Share This News

Related Post

#APP : दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांची अटक म्हणजे इडी, सीबीआय द्वारे केंद्र सरकारने चालवलेली दडपशाही : विजय कुंभार

Posted by - February 27, 2023 0
पुणे : दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या काल रात्री सीबीआयने केलेल्या सुडात्मक अटकेविरोधात आज पुण्यात बालगंधर्व चौक येथे झाशीच्या राणी…
Mumbai Pune Highway

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या 2 तासांचा ब्लॉक

Posted by - November 22, 2023 0
पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे (Mumbai-Pune Expressway) ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी 35/500 येथे गॅन्ट्री उभारण्याचे…

Breaking News ! राणा दांपत्य अजून दोन दिवस कोठडीतच, जामिनावर बुधवारी निर्णय

Posted by - May 2, 2022 0
मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन…

गुजरात विधानसभा निवडणूक: भाजपा 53 तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर

Posted by - December 8, 2022 0
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल आता पुढे येण्यास सुरुवात झाली असून गुजरात मध्ये 53…

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन

Posted by - February 18, 2023 0
पुणे : राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते जुन्नर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदवी स्वराज्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *