‘लगेच गुडघ्याला बाशिंग बांधू नका…!’ अजित पवारांनी वडेट्टीवारांना सुनावले

738 0

भाजपा नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडी लढणार असं विधान करून वाद निर्माण केला आहे. त्यांच्या या विधानावर अजित पवारांनी वडेट्टीवार यांना चांगलेच सुनावले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. गिरीश बापट अजातशत्रू होते. पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या जागेवर काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आत्तापासूनच दावा सांगायला सुरुवात केली आहे.

गिरीश बापट यांचे निधन झाले त्यादिवशी अजित पवार नाशिकमध्ये होते. त्यामुळे ते बापटांच्या अंत्यविधीला येऊ शकले नव्हते. आज अजित पवार यांनी गिरीश बापट यांच्या शनिवारी पेठेतील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वडेट्टीवार यांना चांगलेच सुनावले.

अजित पवार म्हणाले,” हे बघा, लगेच कुणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. अजून गिरीश बापट जाऊन फक्त तिसरा दिवस आहे. एवढी कसली घाई आहे? माणसुकी वगैरे प्रकार आहे की नाही? काही परंपरा महाराष्ट्राची आहे की नाही. लोक काय म्हणतील यांना जनाची नाही तर मनाची तरी आहे की नाही”

Share This News

Related Post

पीयूसी केंद्रांचे नूतनीकरण ठप्प ! पीयूसी केंद्रचालकांनाच माराव्या लागत आहेत आरटीओत फेऱ्या !

Posted by - January 19, 2023 0
शहरातील प्रदूषण चाचणी केंद्राचा म्हणजे पीयूसी परवाना नूतनीकरणास तांत्रिक अडचणी येत असल्यानं ‘पीयूसी’ केंद्र चालकांना ‘आरटीओ’त फेऱ्या माराव्या लागत आहेत.…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : ‘तुमच्या डोक्यात लोचा झाला…’, ‘त्या’ पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर पलटवार

Posted by - January 25, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकासआघाडीच्या नेत्यांची (Prakash Ambedkar) मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीसाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे…

“राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करावे…!”, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची पदमुक्त होण्याची इच्छा

Posted by - January 23, 2023 0
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या…

‘या’ दिवशी होणार विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदान

Posted by - May 26, 2022 0
मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. 2 जून रोजी…

१४ तासानंतर सापडला संगणक अभियंत्याचा मृतदेह, पुणे जिल्ह्यातील घटना

Posted by - April 8, 2023 0
पानशेत परिसरातील धिंडली (वरघड) येथील एका रिसॉर्टच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात परप्रांतीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा पाय घसरून पडल्याची घटना शुक्रवारी (ता. ०७)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *