Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार यांचा पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा

635 0

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे अजित पवार गेल्या 32 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक होते. अजित पवार 1991 पासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहत होते. बँक राज्यात नंबर वनला आणण्यामध्ये अजित पवारांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आज अचानक जिल्हा बँकेचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. जिल्हा बँँकेच्या अध्यक्षांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

“उपमुख्यमंत्रीपदाचा वाढता व्याप आणि पक्षाची वाढती जबाबदारी लक्षात घेता अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अजित पवार यांची पकड असून 1991 पासून अजित पवार हे सलग पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून येतात आत्तापर्यंत तब्बल सात वेळा या बँकेचं अध्यक्ष पद देखील अजित पवार यांनी भूषवलं आहे. दरम्यान आता अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी संचालक म्हणून कोणाची निवड होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News

Related Post

राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी वसंत मोरे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

Posted by - April 10, 2022 0
वसंत मोरे हे उद्या मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप…

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना ‘ते’ वक्तव्य भोवलं! मालेगावात गुन्हा दाखल

Posted by - January 4, 2024 0
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव (Malegaon) तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना…
Ajit Pawar

अजित पवारांनादेखील भाजपमध्ये यायचं होतं’; ‘या’ आमदाराचा दावा

Posted by - May 14, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत एक…
Sangli Loksabha

Sangli Loksabha : मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - April 26, 2024 0
सांगली : सांगलीच्या राजकीय वर्तुळातुन (Sangli Loksabha) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार…

मोठी बातमी : विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदार राज्यपालांच्या भेटीला; त्यानंतर तातडीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : नुकतीच महिलांच्या बाबत आक्षेपार्ह विधाने झाल्याने महिला नेत्यांमध्ये सध्या धुसफुस सुरू आहे. राजकारणामध्ये राजकीय कामकाज सोडून महिलांवर अवमानकारक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *