sharad pawar and ajit pawar

Ajit Pawar : शरद पवार अजित पवारांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली; भेटीत नेमकं काय घडलं?

642 0

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील बडे नेते पुण्यात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील या बैठकीला होते. तर, दुसरीडे पुण्यातील चांदणी चौकातील उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार होते. या निमित्तानं पुण्यात राजकीय घडामोडी वाढणार असा अंदाज होता.

यादरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कोरेगाव पार्क येथील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यामध्ये बैठक झाली. कोरेगाव पार्क मधील बंगला क्रमांक 73 मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर अजित पवार सर्किट हाऊस या ठिकाणी आले. त्यानंतर सरकारी ताफा त्याच ठिकाणी ठेऊन अजित पवार खासगी वाहनाने कोरेगाव पार्क याठिकाणी पोहचले.

यादरम्यान शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील बैठक मधेच सोडून निघाले होते. यावेळी जयंत पाटील हे देखील बैठकीमधून बाहेर पडत शरद पवार यांच्यासोबत निघाले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Share This News

Related Post

मिनी लोकसभेचा आज फैसला ; राजकीय प्रतिष्ठा पणाला

Posted by - March 10, 2022 0
राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश,…
Pune News

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

Posted by - May 22, 2024 0
पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणामध्ये (Pune Porsche Accident) आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी…
Pune News

Pune News : मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार : मुरलीधर मोहोळ

Posted by - April 28, 2024 0
पुणे : पुण्याच्या (Pune News) वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे सध्या अशक्य आहे. त्यामुळे मुळशीतून पुण्यासाठी पाच टीएमसी…

आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाची सर्व तयारी पूर्ण ; 23 सप्टेंबरला होणार लोकार्पण

Posted by - September 13, 2022 0
अहमदनगर : आष्टी-अहमदनगर रेल्वेचे संपूर्ण कामकाज पूर्ण झाले आहे. रेल्वेची ट्रायल देखील घेण्यात आली. येत्या 23 सप्टेंबरला आष्टी अहमदनगर रेल्वेचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *