Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : ‘…तेव्हाच भाजपबरोबर सरकारमध्ये जायचं ठरलं’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

613 0

पुणे : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात खळबळ (Ajit Pawar) उडाली होती. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. हे दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका केली आहे. यादरम्यान अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी पक्ष सोडून आणि पक्षाची मूळ विचारधारा सोडून भाजपाबरोबर चूल मांडली असा आरोप करण्यात आल्याने अजित पवारांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांची गुरुवारी जुन्नरमध्ये सभा पार पडली. यावेळी शरद पवार गटाने केलेल्या टीकेला अजित पवारांनी भर सभेत प्रत्युत्तर दिलं. “शिवसेनेबरोबर सत्तेत बसलेलं चालतं, मग भाजपाबरोबर सत्तेत बसलेलं का चालत नाही? उद्धव ठाकरे यांचं सरकार आता जातंय हे समजलं होतं त्याचवेळी पक्षातील सगळ्यांनी ठरवलं होतं की, आपण आता भाजपाबरोबर सरकारमध्ये जायचं. महाविकास आघाडीत शिवसेनेबरोबर सरकारमध्ये सामील झालेलं चालतं, मग महायुतीत भाजपबरोबर गेलं तर का चालत नाही? राजकारणात वेगवेगळ्या घटना घडत असतात. परंतु, वरिष्ठांनी निर्णय घेतला तर तो बरोबर आणि आम्ही घेतला तर तो चूक. असं कसं चालेल?,” असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : नवी मुंबईत येताच मनोज जरांगेंची तब्येत बिघडली

Chandrapur Crime : चंद्रपूर हादरलं ! ठाकरेंच्या कट्टर युवासेना शहर प्रमुखाची निर्घृणपणे हत्या

CIDCO : गुडन्यूज! सिडकोकडून ‘एवढ्या’ घरांसाठी लॉटरी जाहीर

Republic Day 2024 : मुंबईतील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Share This News

Related Post

मोठी बातमी! राणा दाम्पत्य उद्या दिल्लीत; लोकसभा अध्यक्षांची घेणार भेट

Posted by - May 8, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हनुमान चालीसा चा मुद्दा लावून धरल्यानंतर मातोश्री समोर मान चालीसा करणारच असा निर्धार केलेल्या राणा दाम्पत्याला खार…

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे शिक्षण द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - November 12, 2022 0
मुंबई : शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता ही देशाची आणि  राज्याची ओळख असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुरूप शिक्षणाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे…

युक्रेन येथून जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले ; जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

Posted by - March 7, 2022 0
युक्रेन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या १०२ विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात शासन व प्रशासनाला यश आले…

शिंदे गट आणखी मजबूत व्हावा हीच इच्छा -शिवाजीराव आढळराव पाटील

Posted by - September 4, 2022 0
पुणे: दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *