विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या – अजित पवार

88 0

पुणे- विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात यावा शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची वाढ व्हावी, विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत होण्यासोबतच प्रज्ञावंत, चारित्र्यसंपन्न व्हावेत याकडेही शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, शिक्षण समिती सदस्या अरूणा थोरात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, “नव्या युगाच्या आवाहनांना सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे.
कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक नुकसान भरून काढावे लागणार आहे. कोरोनानंतर शाळेत येणारा विद्यार्थी ताणतणावात राहणार नाही, असे शैक्षणिक वातावरण तयार करण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. पालकांचाही यामध्ये सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक, देशाचे भविष्य आहेत. हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देऊन चालणार नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कौशल्यही त्यांना शिकवायला हवे”

जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे म्हणाल्या, “कोरोना कालावधातीही शिक्षकांनी ज्ञानदानाचे अत्यंत चांगले कार्य केले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण सातत्याने सुरू राहीले” ग्रामीण भागातील अनेक शाळा आदर्श करण्यासाठी शिक्षकांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवतारे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सामान्य ज्ञान मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुणवंत शिक्षक, शिक्षिका, त्यांचे कुटुंबीय, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : नामदेव जाधवच्या तोंडाला काळे फासले; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Posted by - November 18, 2023 0
पुणे : मागील काही दिवसांपासून नामदेव जाधव नावाचा इसम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर अर्वाच्च भाषेत टीका करत आहे. शाळेत असताना…
Mumbai Pune Highway

Pune-Mumbai Expressway : सोमवारी पुणे-मुंबई द्रुतगतीवर अवजड वाहतुकीला बंदी

Posted by - May 19, 2024 0
पुणे : मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेकडून…

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग जाहीर

Posted by - May 19, 2022 0
पुणे- पुणेमहापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. एकूण 173…

पुणे विभागात ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देणार – विभागीय आयुक्त सौरभ राव

Posted by - November 2, 2022 0
पुणे : पुणे विभागस्तरीय रोजगार मेळाव्याचे पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (३ नोव्हेंबर) आयोजन करण्यात आले…

17 तासांच्या अज्ञातवासानंतर अजितदादा प्रकटले ! सर्वांचा एकच प्रश्न….एवढे तास कुठे होते ?

Posted by - April 8, 2023 0
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल दुपारी अचानक गायब झाले. सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार नॉट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *