‘कुत्र्यांचे लाड घरी करा, गादीवर झोपवा’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुणाला झापले? वाचा..

353 0

पुणे- अजित पवार कधी कुणाला चिंता काढतील ? कधी कुणाला टोमणे मारतील किंवा कधी कुणाला झोपतील हे कुणाला सांगता येत नाही. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार तळजाई वनउद्यान प्रवेशद्वाराच्या उदघाटनाला आले असताना त्यांनी पुणेकरांना कडक शब्दात झापले.

आज, शनिवारी सकाळी- सकाळी अजित पवार यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊन अधिकाऱ्यांची पळापळ केली. अजितदादांनी यावेळी तळजाई टेकडीला चांगली रपेटही मारली. यावेळी बोलताना त्यांनी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या पुणेकरांवर टीका केली. अजित पवार म्हणाले, “पुणेकरांनी तळजाईवर पाळीव कुत्री आणू नयेत. कुत्र्यांचे जे काही लाड करायचे आहेत ते घरी करा, हवं तर गादीवर झोपवा… पण इथं तळजाईवर नको” अजित पवार पुढे म्हणाले, “मी तळजाईकडे येताना बघितलं लोक रस्त्यावरच कचरा टाकतात हे बरं नाही. भटकी कुत्री तळजाईवर येतात, काही लोक पाळीव कुत्री पण फिरायला घेऊन येतात, हे थांबलं पाहिजे. तळजाईवरची ससे आणि मोर कुत्री खातात, या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. तळजाईवर वनोद्यानाचं सौंदर्य टिकलं पाहिजे, इथली झाडं जगवण्यासाठी टेकडीवर पाइपलाईन टाकावी लागेल, त्यासाठी मी निधी देतो. इथलं फुलपाखरू उद्यान बहरलं पाहिजे. तळजाईमुळे पुणेकरांना ऑक्सिजन मिळतोय, म्हणजे हे वनउद्यान टिकलं पाहिजे”

अधिकाऱ्यांना देखील खडसावले

अधिकाऱ्यांना पुणे पोस्टिंग पाहिजे असेल तर सकाळी उठायलाच पाहिजे, कारण मी सकाळीच कामाला सुरूवात करतो, हे अधिकाऱ्यांना नेहमी लक्षात ठेवावं. अजित पवारांमुळे अधिकाऱ्यांना पण सकाळी उठावं लागतं… पुन्हा अशी कुरबूर नको. मी आज ठरवून तळजाईवर आलो, मला इथली कामं बघायची होती, लोकांनाही भेटलो समस्या जाणून घेतल्या असंही अजित पवार म्हणाले.

Share This News

Related Post

Sharad-Pawar-vs-Ajit-Pawar

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Posted by - December 25, 2023 0
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना थेट शरद पवार यांना थेट…

चंद्रकांत पाटलांकडून सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या ‘ त्या ‘वक्तव्याबद्दल दिलगिरी

Posted by - May 29, 2022 0
पुणे- खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली होती.…

पुण्यात दुसरा मिती लघुपट महोत्सव, अभिनेते अजय पूरकर यांनी केले पोस्टरचे प्रकाशन

Posted by - April 20, 2022 0
पुणे- लघुपटांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्यासाठी सर्जनशील तरुण पिढीला एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दुसऱ्या मिती लघुपट महोत्सवाचे…
Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident: ‘समृद्धी’वरील अपघात प्रकरणी आली मोठी अपडेट; बसचालकाविरोधात ‘या’ कलमांतर्गत दाखल केला गुन्हा

Posted by - July 1, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ (Buldhana Bus Accident) आज सकाळी बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 25…

BIG BREAKING : अविघ्न’मध्ये विघ्न ! मुंबईतील ‘वन अविघ्न’ इमारतीच्या 35 व्या मजल्यावर आग; अनेक नागरिक अडकल्याची भीती

Posted by - December 15, 2022 0
मुंबई : मुंबईच्या लालबाग मधील वन अविघ्न या इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 35 व्या मजल्यावर भीषण आग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *