हॉटेल, पोलिसांवर कारवाई झाली, जेसीबीही चालला पण पार्ट्या आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर कारवाई कधी ?

981 0

पुण्यातील एल थ्री बार मधील पहाटेपर्यंत चाललेली पार्टी आणि वॉशरूम मध्ये ड्रग्स घेणारी मुलं यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झोपलेले प्रशासन पुन्हा जागे झाले. पोलीसांनी बार मालकासह नऊ जणांवर गुन्हे दाखल केले. आठ जणांना अटकही केली. दरम्यान, बारच्या मालकांवर आणि पार्टी करणाऱ्या मुलांवर जोरदार टीकाही केली जाते मात्र या पार्टीचा जो कर्ता करविता होता, ज्यावर तितकसे लक्ष दिले गेलेले नाही तो होता या पार्टीचा इव्हेंट मॅनेजर… पुण्यात अशा ड्रग्स पार्ट्या ऑर्गनाईज करणाऱ्या इव्हेंट मॅनेजर्सचा सुळसुळाट झाला आहे. ज्यांच्यावर वचक ठेवणे गरजेचे झाले आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत मनोरंजनात्मक, सामाजिक कार्यक्रम, उच्चभ्रु लोकांचे लग्न सोहळे, कंपन्यांच्या प्रमोशनसाठी केले जाणारे कार्यक्रम हे इव्हेंट मॅनेजर किंवा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फे केले जायचे. मात्र तीन-चार वर्षांपासून पुण्यातील रेव पार्ट्या, ड्रग्स पार्ट्या यादेखील इव्हेंट मॅनेजर्स कडून मॅनेज केल्या जातात. पुण्याच्या संस्कृतीला छेद देणारी सनबर्न पार्टी झाल्यापासून अशा प्रकारच्या अमली पदार्थ खुलेआम पुरवणाऱ्या पार्ट्या पुण्यामध्ये वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या इव्हेंट मॅनेजर्सचे ड्रग्स पुरवणाऱ्यांबरोबर चांगले संबंध असतात. त्यामुळेच अशा इव्हेंट मॅनेजर्सची कसून चौकशी केल्यास अनेक ड्रग डीलर आणि ट्रक पेडलर यांचे धागेदोरे उघड होऊ शकतात.

एल थ्री बारमध्ये घडलेल्या घटनेप्रमाणे इतर घटना घडल्यास संबंधित चालक, मालक, कर्मचारी, ग्राहक, विक्रेते अशा सगळ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र अशा पार्ट्या आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळेच या कंपन्यांवर वॉच ठेवण्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी किंवा नियमावली असावी. या कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या इव्हेंट मध्ये अशा प्रकारच्या अवैध गोष्टी होत नाहीत ना याकडे पोलीस प्रशासन आणि नार्कोटिक्स डिपार्टमेंटने लक्ष द्याव. तरच या इव्हेंट कंपन्या आणि मॅनेजर्स वर आळा बसेल, असे मत राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य पुणेकर व्यक्त करत आहेत

Share This News

Related Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांची भेट; हर हर महादेव आणि वेढात मराठे वीर दौडले सात चित्रपट वादावर चर्चा

Posted by - November 16, 2022 0
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे हे त्याच्या पुण्यातील ‘राजमहाल’ निवासस्थानी पोहोचले आहेत. हर…
Breaking News

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी ! केंद्रीय निवड समितीकडे ‘या’ 5 नावांचा प्रस्ताव

Posted by - January 27, 2023 0
पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडे 5 नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.…

तीन मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्यावर पुण्यात पाचशे कोटीचा; प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Posted by - October 31, 2022 0
पुणे : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यात जात असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…

अबब ! जळगावात पारा 44 अंशांवर

Posted by - April 9, 2022 0
जळगाव जिल्ह्याच्या उष्णतेचा पारा 44 अंश आकडे पोहोचला आहे, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये ,अशा…
election-voting

Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत झाले ‘एवढे’ मतदान

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *